विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश

जालना,७ एप्रिल / प्रतिनिधी :- मौजे खळ्याल गव्हाण (ता जाफराबाद) येथे विहिरीत बिबट्या पडला.त्याला वन विभागाने  सुरक्षित बाहेर काढले.  रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात  अंधाराचा अंदाज न आल्यामुळे खळ्याल गव्हाण येथे विहिरीत  दीड वर्ष वयाचा बिबट्या पडला.  शेतकरी सुखदेव बनकर  7 एप्रिल गुरूवारी रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास त्यांच्या शेतात गेल्यानंतर त्यांना शेतातील विहिरीतून आवाज येत असल्याचे जाणवले.त्यावेळी त्यांनी कशाचा आवाज येतो हे पाहताना अंदाज घेण्यासाठी त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत एका कपारीला एक बिबट्या बसलेला त्यांना दिसला. तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना  व पोलिसांना  फोन करून विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती त्यांनी दिली. 


विहिरीत बिबट्या पडल्याची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरातीलगावात पसरल्याने बिबट्या बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी आवश्यकअसलेला पिंजरा आणण्यात  तीन तासाचा अवधी गेला. पिंजरा आल्यानंतर काहीतासाच्या परिश्रमानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात   वनविभागाचे कर्मचारी व टेंभुर्णीचे सपोनि रविंद्र ठाकरे  नागरिकांना यश आले.  बिबट्याचीवैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पाठविण्यात आल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

  सत्यजित गुजर, वनसंरक्षक औरंगाबाद प्रादेशिक, व  सूर्यकांत  मंकावार, उपवनसंरक्षक औरंगाबाद प्रादेशिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, तसेच गजभिये  उपवनसंरक्षक बुलढाणा, पुष्पा पवार सहाय्यक वनसंरक्षक जालना , अभिमन्यू खलसे वनपरिक्षेत्र जालना उत्तर  एस एस दुबे वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा  हे उपस्थित होते.  बिबट्यास  सुरक्षित विहरीतून बाहेर काढून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले  वैद्यकीय तपासनी करण्यात आली   एस एस दुबे वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा , आर बी पवार वनपाल,राठोड वनपाल,के टी पचलोरे वनपाल, एस बी जाधव वनरक्षक, जे ए बिल्लारी वनरक्षक, ए एस भावले वनरक्षक, एन एच सोडगिर वनरक्षक, एस जे शिनगारे वनरक्षक,व्ही एन तिडके वनरक्षक, आर जी माटे वनरक्षक, जी जी टेलांग्रे वनरक्षक, एच एच पठाण वनरक्षक, के एच सलाम वनरक्षक, श्रीराम काकड वनरक्षक, ये व्ही बाबूलकर वनरक्षक, समाधान माटे वनरक्षक, संदीप मडावी वनरक्षक, प्रवीण सोनुने वनरक्षक, दीपक गायकवाड वनरक्षक, सागर भोसले वनरक्षक, शे आयस वनरक्षक, शे समीर वनरक्षक, येस डी सानप वाहनचालक उपस्थित होते