रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे- लता मुळे

औरंगाबाद,७ एप्रिल / प्रतिनिधी :- आज कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त इनरव्हील क्लब औरंगाबादच्या वतीने  “भव्य रक्तदान शिबीर” आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन इनरव्हील क्लब, औरंगाबाद अध्यक्ष लता मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.     

यावेळी लता मुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सात एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे याच दिवशी 72 वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. त्यामुळे सात एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. रक्तदान शिबिराला आलेले सर्व विद्यार्थी तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा सर्वानी घ्यावा, असा आहे. आपले कार्य पाहून देवालाही आपणाला जन्म दिल्याचा अभिमान असेल’, असे कौतुक मुळे यांनी  केले. यावेळी इनरव्हील क्लब, औरंगाबादच्या पी. डी. सी. ऊषा धामणे, आशा भांड, अंजली दाशरथी, अंजली सावे, हिरा पेरे पाटील, मंगल चव्हाण, रेखा केदारे आणि इनरव्हील क्लब सदस्य तसेच डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. दत्तात्रय शेळके, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. गणेश डोंगरे, डॉ.  लता काळे, डॉ. जयश्री देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.