पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस दरवाढ विरूध्द काँग्रेस पक्षाचे जालन्यात जोरदार निदर्शने

जालना,३१मार्च /प्रतिनिधी :- केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या दरामध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे याचा जनसामान्यावर मोठा आर्थीक फटका बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे जगणे कठिण होवून बसले आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी या मागणीसाठी जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 31 मार्च गुरूवार रोजी जुना जालना गांधी चमन येथे प्रचंड निदर्शने करण्यात येवून मोदी सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियागांधी यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण देशामध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई मुक्त भारत आंदोलन सप्ताह छेडण्यात आला आहे. त्यानुषांगाने राज्यामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारविरूध्द आंदोलन करण्यात येत आहे. आज गुरूवार रोजी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आर. आर. खडके यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी प्रस्ताविक करतांना आंदोलनाविषयी बोलतांना सांगीतले की, केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये महागाईचा कळस गाठला आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसचे दर भरमसाठपणे वाढविल्यामुळे गरीब आणि सामान्य मानसाच्य दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने वाढविलेले दर ताबडतोब मागे घ्यावे नसता काँग्रेस पक्ष सामान्य जनतेसाठी रस्त्यावर आक्रमकपणे उतरेल याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी असा ईशारा शेख महेमूद यांनी दिली.
याप्रसंगी प्रा. सत्संग मुंढे, एकबाल कुरेशी, राहुल देशमुख, दिनकर घेवंदे, जावेद बेग, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, विठ्ठलसिंग राजपुत, लक्ष्मण म्हसलेकर, रामप्रताप खरात, शरद देशमुख, संभाजी गुढे, शेख जावेद बागवान, डॉ. विशाल धानुरे, नारायण वाढेकर, शेख शमशुद्दीन, नंदाताई पवार, मंजु यादव, चंदा भांगडिया, मंगल खांडेभराड, मुफ्तार खान, चंद्रकांत रत्नपारखे, बाबासाहेब सोनवने, सय्यद करीम बिल्डर, शेख वसीम, रहिम तांबोळी, सतिष वाहुळे, फकीरा वाघ, गणेश चांदोडे, अनिल कांबळे, मनोज गुढेकर, जावेद अली, बाबासाहेब घोलप, नारायण मुंढे, देविदास वाघुंडे, बापु घायाळ, भाऊसाहेब सोळुंके, सोपान सपकाळ, विष्णू भालेराव, शफी इनामदार, राजु शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन जालना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत जाधव यांनी केले तर बाबसाहेब सोनवने यांनी शेवटी आभार मानले.