केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये घसघशीत वाढ

१ जानेवारी २०२२ पासून  देय अतिरिक्त हप्ता वितरित करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

31% या विद्यमान दरामध्ये  3% वाढ

नवी दिल्ली,३० मार्च /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचा (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा निधीचा  (डीआर)  01.01.2022  पासून देय असलेला  अतिरिक्त हप्ता  वितरित करायला मान्यता दिली आहे. दरवाढीची भरपाई करण्याच्या दृष्टीने, या माध्यमातून  मूळ वेतन/निवृत्तीवेतनासाठी असलेल्या  31% या विद्यमान दरामध्ये  3% वाढ दर्शवण्यात आली आहे.नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचा डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला आहे. 

7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित  ही वाढ स्वीकृत सूत्रांनुसार आहे.

महागाई भत्ता आणि महागाई दिलासा निधी  या दोन्हींमुळे सरकारी तिजोरीवर प्रतिवर्ष  एकत्रित 9,544.50 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. याचा फायदा सुमारे 47.68 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना  होणार आहे.