उष्माघात रुग्णावर करावयाची उपयायोजना व उपचार

औरंगाबाद ,३० मार्च /प्रतिनिधी :- प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे व जून 4 महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. मार्च 2022 मध्ये सध्या दिवसोदिवस तापमान मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्या मुळे या 4 महिन्यात उष्माघाता मुळे मृत्यू होणार नाही या करीता पुढील प्रमाणे उपाययोजना व उपचार उपचाराची सोय व प्रतिबंधात्मक उपयायोजने बाबत जनतेला सविस्तर देण्यात येत आहे.

            उष्माघात होण्याची कारणे उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, कारखान्यामध्ये बॉयलर रुम मध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे जास्त तापमानाच्या खोली मध्ये मध्ये काम करणे, घट्ट कपड्यांच्या वापर करणे, जास्त तापमानात बाहेर जाताना डोक्याला रुमाल अथवा टोपी न घालता जाणे. उष्माघाताची लक्षणे थकवा येणे, ताप येणे, व त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढ, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इ.

            प्रतिबंधात्मक उपाय वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करण्याचे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात असताना करावी, उष्णता शोषून घेणार कपडे (काळ्या किंवा रंगाचे कपडे वापरु नये) सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे, जलसंजीवणी चा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, अधून मधून उन्हामध्ये कामे करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा उपरणे याचा वापर करावा. यापैकी लक्षणे सुरु होताच ताबडतोब ऊन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावेत.

            उपचारासाठी रुगणास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कूलर ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णाला बर्फाच्या पाण्यानी अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात व आईस पॅक लावावेत याबरोबरच सलाईन द्यावे.  असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके  यांनी कळविले आहे.