माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण

धक्कादायक! महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांचा कोरोना, पुण्याला हलवलं

लातूर : कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय-89) यांचा कोरोना रिपोर्ट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पुढील उपचारासाठी निलंगा (जि. लातूर) येथून पुण्यात हलवण्यात आलं आहे. याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता.

शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना गेल्या तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होतं. त्यांच्या कोरोनाची लक्षणं जाणवत होती. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. निलंगेकर पाटील यांच्यावर निलंगा येथे उपचार करण्यात आले. 

काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले निलंगेकर हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आहेत. १९८५ मध्ये नऊ महिन्यांच्या अल्प काळासाठी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. २००२ मध्ये मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते महसूलमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *