महा_जॉब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? : सत्यजित तांबे
मुंबई : महाविकास आघाडी सरकार कसे एकजूट आहे यासाठी कितीही दीर्घ मुलाखती झाल्यात तरी, अद्याप महाविकास आघाडी सरकारमधील नाराजीचे सुर कानी पडतच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच महाजॉब्स पोर्टले ऑनलाईन उद्घाटन केले. महाजॉब्स या पोर्टलवरून आता काँग्रेसने नाराजी जाहीर केली आहे.
Satyajeet Tambe@satyajeettambe·#महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ? आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.
महाजॉब्स पोर्टलवरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरून नाराजी जाहीर केली आहे. ‘#महा_जॉब्स् योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची, की शिवसेना-राष्ट्रवादीची?’ असा प्रश्न त्यांनी ट्विटरवरून केला आहे. तसेच, महाजॉब्स पोर्टलचे पोस्टरदेखील तांबे यांनी ट्विट केले आहे. त्या फोटोत शिवसेना व राष्ट्रवादीचेच मंत्री दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचेच फोटो आहेत. त्यात काँग्रेसच्य़ा एकाही मंत्र्यांचा उल्लेख वा कोणताही फोटो नाही.
यावरूनच तांबे यांनी आपली नाराजी जाहीर केली व आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे असे तांबे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.