जालना जिल्‍हा मारवाडी महिला संमेलनच्‍या वतीने गणगौर उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा

जालना,२९मार्च /प्रतिनिधी :- अखिल भारतीय जालना जिल्‍हा मारवाडी महिला संमेलनच्‍या वतीने गणगौर उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गणगौर मिरवणूक काढण्यात आली होती.  महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्‍या होत्‍या.

मारवाडी महिला संमेलनाच्‍या अध्यक्षा सावित्रीदेवी मल्लावत म्‍हणाल्‍या की,भारतीय संस्‍कृतीमध्ये खुप मोठे महत्‍व असून, जुने सण व रितीरिवाज पुढेही चालु राहावे, त्‍यातील परंपरा कायम राहावी, या उद्देशाने गणगौर उत्‍सवाचे आयोजन करण्यात आले.    मधुर बँकवेट हॉल ते आदर्श भगिनी हॉल पर्यंत गणगौर शोभायात्रा काढण्यात आली. गणगौर गीत स्‍पर्धा, सोलर श्रृंगार, स्‍पर्धा, मेहंदी मांडणी स्‍पर्धा, गणगौर नृत्‍य स्‍पर्धा, धूमर गीत आदी स्‍पर्धा या प्रसंगी घेण्यात आल्‍या. राधाकृष्णांवर पुष्पांचा वर्षाव करुन गणगौरची पूजा करण्यात आली.

यावेळी स्‍मिता चेचाणी, कविता पित्ती, मधुलता भक्कड, सीमा पंच, शांता नवलखा, अनिता तवरावाला, सोनल मित्तल, पूजा तवरावाला, शोभा आर. अग्रवाल व महीला  मोठ्या संख्येने  उपस्‍थित होत्‍या.