महागाई, बेरोजगारी आणि कामगार कायद्याविरोधात बँक कर्मचारी आणि अधिकार्‍यांचा सरकारविरोधात एल्गार

औरंगाबाद,२८ मार्च /प्रतिनिधी :- देशभरातील नऊ कोटी कामगारांसह बँकींग क्षेत्रांमधील AIBEA , AIBOA आणि BEFI या तीन संघटना या देशव्यापी संपामध्ये सहभागी आहेत. या संपाचा एक भाग म्हणून औरंगाबाद शहरातील जवळपास 200 बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी आज बँक ऑफ इंडिया क्रांती चौक शाखेसमोर आपल्या विविध मागण्यासाठी सरकारविरोधी निदर्शने केली.

बँकांच्या दोनदिवसाच्या संपामध्ये आज 28 तारखेचा पहिल्या दिवसाच्या संपाच्या निमित्ताने निदर्शने कार्यक्रम करण्यात आला यामध्ये विविध बँकेचे कामगार व अधिकारी उपस्थित होते जोरदार घोषणांचा कार्यक्रम व निदर्शने झाले कॉम्रेड जगदीश भावठाणकर कॉम्रेड कैलास कानडे यांनी मार्गदर्शन केले संचालन राजेंद्र देवळे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाचे उपस्थिती होती सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरुद्ध प्रामुख्याने हा संप होता जनतेची अपेक्षा होती की, आपल्या हाताला रोजगार मिळेल महागाई कमी होईल अशा विविध प्रकारच्या अपेक्षा जनतेनी या सरकारकडून केलेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षामध्ये आज महागाईच्या झळा या देशातील गोरगरीब जनतेला बसत आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

बँकिंग क्षेत्रातील बँक खाजगीकरणाच्या मुद्द्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागच्या बजेटमध्ये आयडीबीआय बँकेसह इतर दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे जाहीर केले, परंतु लोकसभेच्या मागील अधिवेशनामध्ये बँकिंग कायद्यातील बदलांचा अजेंडा असतानासुद्धा त्यावर काहीही कामकाज झालेले नाही त्याला पार्श्वभूमी होती ती त्यावेळी शेतकरी कायदे या सरकारला मागे घ्यावे लागले होते आणि देशांमधील प्रमुख पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. देशातील पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर आणि त्या निवडणुकांचे निकाल हाती लागल्यानंतर या सरकारचा पुन्हा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आता कोणत्याही क्षणी हे सरकार बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट मध्ये बदल करू शकते. तसेच कोणत्याही क्षणी या देशातील बँकांचे खाजगीकरण केले जाऊ शकते. या सरकारला जर रोखायचं असेल तर आपल्या भारत देशामध्ये या लोकशाहीमध्ये देशातली जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि फक्त जनताच या मदमस्त सरकारला रोखू शकते त्यामुळ विरोधी, कामगार विरोधी धोरणापासून या सरकारला रोखायचे असेल तर फक्त बँक कर्मचारी संघटनाच नाही तर या देशातील प्रत्येक नागरिकाला, विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन या सरकारच्या विरोधात एक मोठा लढा उभारल्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही.

तसेच सार्वजनिक बँकांमध्ये भरती मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे तसेच कंत्राटी पद्धत बंद करावी कारण त्यामध्ये कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होते तसेच जुनी पेन्शन सर्वांना लागू करावे व थकित खात्यामध्ये वसुली करून बँका मजबूत कराव्यात तसेच सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण न होऊ देता सर्वसामान्य जनतेचा पैसा हा सामान्य जनतेसाठी वापरला जावा अशी मागणी झाली त्यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याचे आवाहन केले केले. आजच्य शहर आणि आसपासच्या परिसरातील जवळपास तीनशे ते साडेतीनशे बँक कर्मचारी अधिकारी सहभागी होते. तर आजच्या या बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहर आणि जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बँका वगळता इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांची कामकाज ठप्प होतेया कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉम्रेड मनिंदर कांसा कॉ शीला खरात कॉ नेहा भीरंगे कॉ निलेश खरात कॉ सचिन देशपांडे कॉ ईश्वर मुरकुंडे कॉ संजय वाघाडे कॉ सदानंद बीडकर यांनी प्रयत्न केले.