आपले श्रेष्ठत्व इतरांनी ओळखले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे – चंद्र प्रकाश त्रिपाठी

जालना,२८ मार्च /प्रतिनिधी :- लोकांना आपल्या बुद्धीच्या प्रतिभेचा साक्षात्कार झाला  आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहात हे लक्षात आल्यामुळे आपण शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला आहात याच सोबत आपले श्रेष्ठत्व इतरांनी ओळखले पाहिजे होयासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ उद्योजक बजाज ऑटो लिमिटेडचे सीएसआर सल्लागार  चंद्र प्रकाश त्रिपाठी यांनी व्यक्त केले.

जालना एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित लोकसहभागातून होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या समारंभात ते बोलत होते. आपल्या वेगळेपणाच्या शक्तीचा सदुपयोग करा शिष्यवृत्ती मिळाली याचा अर्थ आपल्यावर कोणी दया दाखवलेली नाही विमन्रतेतून उन्नतीसाठी अधिक सहज मार्ग निर्माण होतात आपण सक्षम झाल्यावर आपल्यासारख्या इतरांना मदतीचा हात द्यायला हवा असे त्रिपाठी यांनी सांगितले. 
आपण निवडलेल्या क्षेत्रात  काम करताना त्यात आपण निष्णात झाले पाहिजे.एक चांगला माणूस आपण झाला पाहिजेत. संधीचा फायदा घेऊन भविष्य घडवावे असे जिल्हाधिकारी डाॅ विजय राठोड यांनी सांगितले. ​​ 
यशस्वीतेसाठी आयुष्यात संघर्ष करावा लागतो मात्र तो सगळ्यांना दिसत नसतो मात्र कोणत्याही प्रकारची घाई करू नका चिकटी एकाग्रता  सातत्याने प्रयत्न यांना पर्याय नाही असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल म्हणाले.


शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक नेत्वृत्व उभे राहणे अतिशय गरजेचे झाले आहे तरच शिक्षणाचा आजचा घसरलेला दर्जा उंचावेल असे निवृत्त प्राचार्य डाॅ. रामलाल अग्रवाल यांनी सांगितले. ​​


प्रास्ताविक प्रा.सुरेश लाहोटी यांनी तर समारोप अध्यक्ष सुनील रायठठ्ठा यांनी केला .सुत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.या कार्यक्रमात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थांना सामाजिक दायित्व जोपाण्याची शपथ जिल्हाधिकारी डाॅ विजय राठोड यांनी दिली.

लोकसहभागातून 123 होतकरू विद्यार्थ्यांना सतरा लाख रुपयांची शिष्यवृत्ती

लोकसहभागातून जिल्ह्यातील 123 होतकरू विद्यार्थ्यांना सतरा लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.कलश सीड्स, एसआरजे पित्ती ग्रुप,भाईश्री फाउंडेशन ,राजेश देवीदान ,रामकिसन मुंदडा, महोदया सीड्स, शिवरतन मुंदडा परिवार, डाॅ महेंद्र व डाॅ.प्रतिभा करवा,डाॅ शुभांगी दरख साबू,डाॅ विशाल पंजाबी, नरेंद्र लुणिया यांच्या आर्थिक सहयोगाने ही शिष्यवृत्ती देण्यात आली.वैद्यकीय, अभियांत्रिकी  पदवी अभ्यासक्रमास पंचेवीस हजार,तंत्र निकेतन पदवीका अभ्यासक्रमास पंधरा हजार, सीए फाउंडेशन,अकरावी,बारावी विज्ञान व वाणिज्य,फार्मसी या अभ्यासक्रमासाठी पंचेवीस हजार रुपये अभ्यासक्रम पूर्ण होईल तोपर्यंत दरवर्षी देण्यात येत आहे.