विकासकामांची प्रसिद्धी न होण्यासाठी विरोधकांचे दररोज कटकारस्थान- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

औरंगाबाद ,२५ मार्च /प्रतिनिधी :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांसह शिवसैनिकांना आधार दिला. त्यांचा हा स्वभावगुण महाविकास आघाडी सरकारमध्ये कायम असून सर्वत्र कौटूंबिक जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र विरोधकांना हे सहन होण्यापलिकडे झाले आहे. त्यामुळे दररोज नवनवीन षढयंत्र रचत बदनामी करण्याचे काम विरोधक करत आहे. विकासकामांची प्रसिद्धी होऊ नये, यासाठी आंदोलने, निर्देशने करत लोकांची लक्ष विचलीत करत आहे. मात्र सरकारच्या या कौटूंबिक वातावरणाला विरोधकांचा फरक पडत नसल्याचे टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हाणला.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्याचे आदेश पदाधिकारी यांना दिले आहे. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत हे सोमवारपासून संभाजीनगर जिल्ह्याच्या दौरयावर आले आहेत. वैजापूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानातंर्गत शीऊर, गारज, वाकला, पोखरी, खंडाळा, बोरसर, मनूर येथे शिवसेनेच्या बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायत राऊत यांनी विरोधकांना धारेवर धरले.  भाजपची बी टीम असलेल्या एमआयएमला हताशी धरून भाजपने खेळी केली असली तरी शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असून, शिवसेनाप्रमुख बाळासााहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकावर आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून अनेक लोकोपयोगी विकास कामे सरकारने केली आहेत. सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पक्ष पदाधिकारयांची आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मुख्य शत्रू म्हणून भाजप पक्ष उभा असल्याने सर्वांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केले.

शिवसेना नेते लक्ष्मण वडले यांनी शेतकरी व कामगार यांच्याशी राज्यसरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या पाठीशी राहून साथ देण्याचे आवाहन वडले यांनी केले. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, उपनगराध्यक्ष शाबेर खान, ऍड. अशोक पटवर्धन, तालुकाप्रमुख सचिन वाणी, जिल्हा बँक संचालक रामहरी जाधव, गोकुळ आहेर, रामहरी जाधव, चांगदेव जाधव, नंदू जाधव, भरत साळुंके, अंबादास खोसे, रघुनाथ व्यवहारे, गोरख आहेर, राजेंद्र चव्हाण, भाऊसाहेब गायकवाड, शिरीष चव्हाण, भिकन सोमासे, मयूर जानोसे, पंकज जाधव, सूरज तुपे, एकनाथ जाधव, महिला आघाडीच्या सम्पर्कसंघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनिता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, जिल्हा समनव़्यक कला ओझा, उपजिल्हा संघटक लता पगारे, जयश्री लुगारे,  अनिता मंत्री, शिवअंगणवाडी सेनेच्या मराठवाडा चिटणीस मंजुषा नागरे, जिल्हासंघटक राखी सुरडकर, उपजिल्हासंघटक रेणुका जोशी, उपशहरसंघटक राजश्री राणा, उपतालुकाप्रमुख गोरख आहेर, पी.एस. कदम, सलीम वैजापुरी, गोरखनाथ शिंदे, महेश बुनगे, माजी उपसभापती राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा युवा अधिकारी भरत कदम,  तालुका अधिकारी श्रीराम गायकवाड, विभागप्रमुख प्रभाकर जाधव, नंदू जाधव, भिकन सोमासे, उपविभागप्रमुख अंबादास खोसे, अरुण मगर, पांडुरंग जगदाळे, संतोष दौंगे, प्रकाश वाघ, भानुदास पिंपळे, प्रकाश शिंदे, नानासाहेब जगदाळे, संजय पवार, चांगदेव जाधव, सुभाष कदम, दिलीप जाधव, ज्ञानेश्वर ठुबे, पिंटू तुपे, चंद्रकांत पवार, भगवान जाधव, प्रभाकर सोनवणे, अनिल कुळधर, भरत साळुंके, विजय मगर, प्रदीप कोतकर, संदीप पवार, राजेंद्र काटे, दीपक वाघ, बाबासाहेब राऊत, साईनाथ ढोबळे, संतोष साळुंके, कल्याण बोडखे, बाळनाथ मुळे, नरेंद्र सरोवर, नवनाथ कदम, दीपक भोसले, अविनाश सरोदे, रहिम बागवान, सतीश बागूल, विजूभाऊ मगर, रामभाऊ त्रिभुवन, सुनील कटारे, विठ्ठल डमाळे, अरविंद शेवाळे, बाळासाहेब जानराव, मुरली नाना थोरात, कैलास कदम, राजुभाऊ निकम, पिंटू मुंगी, नवनाथ पवार, भगवान डोंगरे, कारभारी पवार, वाल्मीक शेजूळ, सुनील शेळके, किशोर जगदाळे, अरविंद शेवाळे, योगिराज पवार, विजय शिंदे, विश्वास तुपे, कैलास कदम, पुरुषोत्तम पिंगाट, शिवाजी जगदाळे, जयनाथ त्रिभुवन, संजय मगर, ज्ञानेश्वर जाधव, वसंत मगर, ज्ञानेश्वर वाघ, नवनाथ सोमासे, भरत गायके, राज पवार, शुभम ठुबे, शिरीष चव्हाण, पंकज जाधव, भाऊसाहेब मालकर, साहेबराव वाघ, हट्टेसिंग चौधरी, भाऊसाहेब निकम, बापू वाघचौरे, अरुण बढे, प्रकाश वाघचौरे, शांताराम वेळंजकर, ताराचंद वेळंजकर, गणेश शिंदे, खंडाळा येथे माजी उपसभापती प्रकाश शिंदे, पंचायत समिती सदस्य सतीश बागूल, उपतालुकाप्रमुख गोरखनाथ शिंदे, माजी उपतालुकाप्रमुख रामभाऊ त्रिभुवन, शाखाप्रमुख विजय मगर, उपशाखाप्रमुख प्रकाश वाकचौरे, शांताराम वेळजकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, राहुल जाधव, मुरलीधर थोरात, बाळासाहेब जानराव, संजय मगर, वसंत मगर, दिलीप जाधव, नानासाहेब जगदाळे, पांडुरंग जगदाळे, शिवाजी जगदाळे, रहीम बागवान, सलीम शहा, सरपंच विठ्ठल डमाळे, श्रीराम गायकवाड, विजय शिंदे, शिवाजी जाधव, गणेश शिंदे, अक्षय जाधव आदीसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.