लॉकडाऊन काळात ५४२ सायबर गुन्हे दाखल; २८४ जणांना अटक

लॉकडाऊन काळात ५४२ सायबर गुन्हे दाखल; २८४ जणांना अटक

मुंबई दि.१६-  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४२ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २८४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. १५ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  २०४ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –  २२८ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १८ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६० गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २८४ आरोपींना अटक.

■  ११६ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या १४ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात एका व्यक्तीच्या विरुद्ध बदनामी कारक आशयाचा मजकूर असणारी सदर पोस्ट व्हाट्सअँप ग्रुपवर पोस्ट केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *