पंतप्रधानांनी कलाकार आयुष कुंडलची भेट घेतली

दिव्यांग कलाकारासोबतची ही भेट “अविस्मरणीय क्षण” असल्याचे नमूद केले

Image

नवी दिल्ली,२४ मार्च  /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष कुंडल या दिव्यांग कलाकाराची भेट घेतली. आयुष कुंडलला भेटणे हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकांनी या दिव्यांग कलाकाराची चित्रकृती पाहावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ट्वीट संदेशांत पंतप्रधान म्हणाले;

“आज @aayush_kundal शी भेट हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. आयुषने ज्या प्रकारे चित्रकलेत कौशल्य प्राप्त केले आणि आपल्या भावनांना पायाच्या बोटांनी आकार दिला आहे, ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे  आहे,  मला सदैव प्रेरणा मिळावी, यासाठी मी त्याला ट्विटरवर फॉलो करत आहे.”

“मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही @aayush_kundal च्या चित्रकृती आवर्जून पाहा. आयुषने आपल्या चित्रांसाठी एक यूट्यूब चॅनलदेखील तयार केले आहे, ज्यात त्याच्या आयुष्यातील विविध रंगांचा समावेश आहे. https://t.co/8NSZ90UUCT आयुषच्या चॅनलची लिंक आहे”.