विक्रमी निर्यात आत्मनिर्भर भारताचा महत्त्वाचा टप्पा : पंतप्रधान

नवी दिल्ली,२३ मार्च  /प्रतिनिधी :-भारताने निश्चित केलेले 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स किंमतीच्या वस्तूंच्या निर्यातीचे महत्त्त्वाकांक्षी लक्ष्य गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या क्षेत्रातील संबंधित मान्यवर आणि भागीदार, देशातील शेतकरी, विणकर, एमएसएमई उद्योजक, उत्पादक आणि निर्यातदारांचे अभिनंदन केले.

ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारताने 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स किंमतीच्या वस्तूंच्या निर्यातीचे महत्त्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आणि आतापर्यंतच्या काळात प्रथमच हे लक्ष्य गाठले. या यशाबद्दल आपले शेतकरी, विणकर, एमएसएमई उद्योजक, उत्पादक आणि निर्यातदारांचे अभिनंदन करतो. आत्मनिर्भर भारत साकार करण्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. लोकल ग्लोबल झाले. #LocalGoesGlobal” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.