वैजापूर येथील आधार जेष्ठ नागरीक सेवा संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

वैजापूर,२१ मार्च  /प्रतिनिधी :- येथील आधार जेष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सोमवारी अभिवादनाचा कार्यक्रम झाला.जगतगुरु तुकाराम महाराज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वधर्मसमभावचे विचार, त्यांचे स्त्री दाक्षिन्य, राष्ट्रनिष्ठा, मातृभूमी प्रेम व दीन दुबळे यांना न्याय या विचारांची आज समाजाला गरज असून त्यांचे विचार अंमलात आणणे  हेच खरे अभिवादन त्यांना ठरेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी या प्रसंगी बोलताना केले.

शहराचे जेष्ठ नागरिक व पोलीस पाटील गुलाबराव साळुंके यांनी  शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.त्यांनंतर उपस्थित जेष्ठ नागरिक छबू  लोखंडे, श्री.सोमवंशी, पोपटराव भोसले, पी.बी. त्रिभुवन, अशोक पवार, रंजक शेटे,नारायण लाडवाणी, भागीनाथ निकम,जेष्ठ नागरिक संघाचे  अध्यक्ष अण्णासाहेब शेळके, सोन्याबापू गावडे, श्री.उगले. आसाराम निकम आदींनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून शिवाजी महाराजांना अभिवादन केले.