भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्यातील आपलॆ हस्ते भूमिपूजन झालेल्या विकाकामाचे श्रेय घेण्यासाठी अनेकांची स्पर्धा – बबनराव लोणीकर

जालना,२० मार्च /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद असताना आपण मंत्री पदाचा वापर करून जिल्ह्यात अनेक विकास कामे तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून आणली व विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमही आपल्या हस्ते पार पडले परंतु आता राज्यात सत्तांतर होऊन महाआघाडीचे सरकार आले असून या विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी जणू स्पर्धाच लागल्याची खोचक टीका आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
आपल्या मंत्री पदाचा वापर जालन्याच्या विकासासाठी करत जिल्ह्यात अनेक विकासकामे तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर केली होती आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात ५ हजार कोटींचं विकास कामे जिल्ह्यात केल्याचा दावा बबनराव लोणीकर यांनी केला.

Displaying polis 2.jpeg

सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस आपल्या प्राणांची बाजी लावुन नागरिकांच्या संरक्षणासाठी काम करत असतात. गेल्या 50- ते 60 वर्षात  जालना येथील राज्य राखीव दलातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची तसेच इमारतीची दुरुस्ती न केल्यामुळे  दयनिय अवस्था झाली होती. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना दिवस काढावे लागत होते असे लोणीकर यांनी सांगितले.   

जालना येथील राज्य राखीव दलातील कर्मचाऱ्यांनी 26/11 च्या मुंबई येथील हल्ल्यात अत्यंत चोख कामगिरीही बजावली आहे.  अशा कर्मचाऱ्यांप्रती तत्कालीन भाजप  सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या हेतुन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी तसेच प्रशासकीय इमारतीसाठी  सातत्याने पाठपुरावा करुन 192 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेण्यात आला होता  असेही लोणीकर यांनी म्हटले आहे.  कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाचा तसेच प्रशासकीय इमारतीचा दर्जा व गुणवत्ता अत्यंत चांगली राहील याकडे आपण वयक्तिक  लक्ष दिले  असुन गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही. याची काळजी आपण घेतल्याचे  श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
—————–
रेशीम संकलन केन्द्र जालना येथे मंजूर करण्यास केला पाठपुरावा
जिल्ह्यात रेशीम विकास केंद्रास मान्यता

            शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग हा एक अत्यंत किफायतशीर असा जोडधंदा असुन यासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येते.  रेशीम उत्पादनात जालना जिल्हा अग्रेसर असुन कापुस, ऊस या पिकापेक्षा जास्त उत्पादन देणारा व फायदेशीर असा हा उद्योग असुन यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला जास्त पैसे मिळतात.  रेशीम कोषाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना बेंगलोर येथे जावे लागत होते.  परंतू रेशीम कोषाचे खरेदी केंद्र जालना येथे करण्यासाठी तत्कालीन भाजप शासनाने मंजुरी दिली असुन यासाठी 6 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता   रेशीम कोष खरेदी केंद्र कार्यान्वित झाल्याने  जालना जिल्हा, मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
परंतु आपण मंजूर केलेल्या व भूमिपूजन कार्यक्रमाचा नारळ आपल्या फोडण्यात आलेला आहे. परंतु आता राज्यात अपघाताने सत्तांतर होऊन आघाडीचे सरकार आले असून या सरकारमधील नेते लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका लोणीकर यांनी केली आहे.