त्या विद्यार्थ्यांची राज्यात शैक्षणिक व्यवस्था करावी -माहिती सेवा संघाचे जालना जिल्हा अध्यक्ष ॲड .महेश धन्नावत यांची मागणी

जालना,२० मार्च /प्रतिनिधी :- युक्रेन -रशिया यांच्यातील युद्धामुळे  मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाने विनाशुल्क तात्काळ शैक्षणिक व्यवस्था करावी. अशी मागणी माहिती सेवा संघाचे जालना जिल्हा अध्यक्ष ॲड .महेश धन्नावत  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

Displaying 1647778433302.jpg


या संदर्भात रविवारी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ऑनलाईन निवेदनात  ॲड .महेश धन्नावत यांनी म्हटले आहे , आधीच कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे दोन वर्षे  विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झालेला असतांना  युक्रेन व रशिया यांच्यात गत महिनाभर सुरू असलेल्या भिषण युद्धामुळे युक्रेन येथे वैद्यकीय तसेच अन्य उच्च शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी स्वगृही परतले. युद्धाची झळ ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरला थेट पोहोचली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांकरिता केंद्र व राज्य शासनाने विशेष बाब म्हणून वैद्यकीय तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये या विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश देण्याची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी ॲड .महेश धन्नावत  यांनी केली.