आ.बोरणारे विरोधात दाखल खोटया गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या बंदला वैजापुरात प्रतिसाद

वैजापूर,१९ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याविरोधात दाखल विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या बंदला शनिवारी(ता.19) वैजापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

Displaying IMG-20220319-WA0051.jpg

सकाळी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, शिवसेना महिला आघाडीच्या शहरसंघटक पदमाताई  साळुंके, उपशहरप्रमुख डॉ.संतोष गंगवाल, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरेशी, ज्ञानेश्वर टेके, डॉ.निलेश भाटिया, सलीम वैजापुरी, खलील मिस्तरी, बाळासाहेब जाधव, लिमेश वाणी, प्रमोद कुलकर्णी, महेश बुणगे, अमोल बोरणारे, युवासेनेचे आमेर अली, श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, शाखाप्रमुख आवेज खान, कमलेश आंबेकर आदींनी शहरात फिरून बंद चे आवाहन केले.

शहरातील व्यापाऱ्यांनी या आवाहनाला स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. दुपारी 12 वाजेपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.शिवसेनेच्या बंद च्या आवाहनाला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देऊन निषेध नोंदविल्याबद्दल माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी शहरातील व्यापाऱ्यांचे आभार मानले.

आ.अंबादास दानवे यांचे पोलिस महानिरीक्षकांना निवेदन

Displaying IMG-20220319-WA0084.jpg

वैजापूरचे आमदार प्रा.रमेश बोरनारे यांचेवर दबावाखाली खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांचे नेतृत्वाखाली विशेष पोलिस महानिरीक्षक माननीय प्रसन्ना साहेब यांची भेट घेतली यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर ,शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, बाबासाहेब डांगे, महिला आघाडी जिल्हा संघटीका प्रतिभा जगतापताई ,सुनीताताई औलवार, कलाताई ओझा, सुनीता देव, अनिताताई मंत्री, मीनाताई फसाटे,नलिनीताई बाहेती,दुर्गाताई भाटि,आशाताई दातार, प्राजक्ता राजपूत, विद्या अग्निहोत्री, नलिनी महाजन, मीरा देशपांडे आदींचा समावेश होता.