तरुण ट्रक ड्रायव्हरचा दगडाने ठेचून खून

जालना,१९ मार्च /प्रतिनिधी :-आधी दगडाने ठेचून खून, करून नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आलापूर येथील दोन दिवसापासून घरून कामासाठी निघुन गेलेल्या 22 वर्षीय तरुण  ट्रक ड्रायव्हरचा  भोकरदन जालना रोडवर सोयगाव देवी फाट्या जवळ  मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

बेपत्ता असलेल्या एका २३ वर्षीय चालकाचा शेतात वाळलेल्या कापसाच्या पळाट्या खाली लपवलेला मृतदेह आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास भोकरदन- जालना रोडवरील सोयगाव देवी फाट्या जवळ एका शेतात आढळून आला. भगवान राजू तळेकर असे त्या मृत चालकाचे नाव आहे. मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने  मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज आहे. शहरातील उस्मानपेठे परिसरातील भगवान राजू तळेकर हा ट्रक चालक आहे. मागील दोन दिवसांपासून  बेपत्ता होता.

दरम्यान, आज सकाळी ९ गट क्रमांक 177 मधील शेतात तुऱ्हाठया खाली एका तरुणाचा मृतदेह असल्याचे शेतकरी बाजीराव साबळे यांना आढळून आले. त्यांनी भोकरदन पोलीस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड यांना याची माहिती दिली.  त्यानंतर सपोनि जोगदंड, सपोनि राजाराम तडवी, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, गणेश पायघन यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी आधारकार्ड सापडल्याने मृतदेह भगवान तळेकर याचा असल्याचे स्पष्ट झाले. 

आधी दगडाने ठेचून खून 

भगवान दोन दिवसांपासून घरी आलेला नव्हता असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. भगवानचा प्रथम दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून शेतातील तुऱ्हाठ्यात मृतदेह पेटवून देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न असावा. मात्र, कोणाची तरी चाहूल लागल्याने मारेकऱ्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.   

मृतदेह भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणि त्याचे शवविच्छेदन करण्यायात आले त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती घटनास्थ्थ्थळ पंचनामा करून पोलीस पुढील तपास करीत आहेत व नेमका मारेकरी कोण व प्रकरण नेमके कशामुळे घडले याचा शोध घेत आहेत अशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंडे यांनी दिली.