औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय गोरबंजारा वधू-वर घटस्फोटीत, विधवा-विधूर, अंध-अपंग महिला पुरुष परिचय मेळाव्याचे आयोजन

औरंगाबाद,१६ मार्च /प्रतिनिधी :- गोरसिकवाडी गोर सेनेच्या वतीने २६ मार्च २०२२ रोजी औरंगाबादमध्ये गोरबंजारा समाजातील वधू-वर परिचयाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात विवाहेच्छुक वधू वर, घटस्फोटीत, विधवा-विधूर, अंध-अपंग महिला पुरुष सहभागी होऊ शकतात. या मेळाव्यासाठी नोंदणी सुरू असून त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन गोर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दत्ताभाऊ राठोड यांनी केले आहे.
२६ मार्च रोजी औरंगाबादच्या मराठवाडा महसूल प्रबोधिनीमध्ये हा वधू-वर परिचय मेळावा होणार आहे. प्रथमच बंजारा समाजातील घटस्फोटीत तसेच विधवा-विधूर महिला पुरुषांचा परिचय मेळावा आयोजित होत असून त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी 8055888855 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मेळाव्यात सहभागी वधूवरांच्या परिचयाशी संबंधीत पुस्तिकेचेही या वेळी प्रकाशन करण्यात येणार आहे.