नागरिकांना फसवणूक व अन्यायाविरूद्ध दिशादर्शक म्हणून उपयुक्त : डॉ. संतोष काकडे

ॲड.महेश धन्नावत संपादित “ग्राहक राजा जागा हो”ग्रंथाचे प्रकाशन

जालना ,१५ मार्च  /प्रतिनिधी :-दिशाभूल करणाऱ्या जाहिराती ,मापतील पाप, बनावट ,निकृष्ट दर्जाच्या वस्तू, अवाजवी देयके, सेवा दर्जेदार व वेळेवर न मिळणे अशा प्रकारे फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई कशी मिळवावी याकरिता ग्राहक असलेल्या प्रत्येक व्यक्तीस ॲड. महेश धन्नावत यांनी संपादित केलेला  “ग्राहक राजा जागा हो” हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. असा विश्वास राज्य ग्राहक आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. संतोष काकडे यांनी व्यक्त केला. 
नुकतेच एका छोटेखानी सोहळ्यात ग्रंथाचे प्रकाशन डॉ. संतोष काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लेखक, विधिज्ञ तथा रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष ॲड. महेश धन्नावत,रोटरी मिडटाउनचे सचिव प्रशांत बागडी,डॉ. नितीन खंडेलवाल, डॉ.सागर गंगवाल, डॉ.नीरज अग्रवाल, डॉ.सुमीत राठी, यांची उपस्थिती होती. 

Displaying 1647345508702.jpg

डॉ संतोष काकडे पुढे म्हणाले, तेरा  वर्षांपासून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेले विधिज्ञ ॲड. महेश धन्नावत यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच वकील संघटनेचे अध्यक्ष, ग्राहक पंचायतचे सचिव म्हणून काम करताना  महावितरण कंपनीने ग्राहकांना दिलेली अवाजवी देयके, जाहीर केलेल्या शिष्यवृत्तीसाठी खाते उघडून शिष्यवृत्ती न देणाऱी बँक, ए. टी. एम.रकमेचा फ्रॉड , ग्राहकांच्या खात्यातील रक्कम इतरांच्या खात्यात वर्ग करणे, अपघात व अन्य प्रकरणांत विमा कंपन्यांकडून विमा रक्कम न मिळणे, परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस मध्ये नसलेली सुविधा, मोबाईल दुरूस्ती, वेळेवर सुविधा न मिळणे  अशा प्रकरणांमध्ये फसवणूक झालेल्या ग्राहकांची बाजू मांडून त्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. असे नमूद करत  ग्रंथात सोप्या भाषेत,समाविष्ट असलेली  सोळा प्रकरणे  सर्वांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून प्रत्येकास  फसवणूक, अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी माफक दरात असलेल्या  ग्रंथाचा उपयोग होईल. असे  डॉ. संतोष काकडे यांनी सांगितले. 

सुञसंचालन सचिव प्रशांत बागडी यांनी केले तर प्रतिक नानावटी यांनी आभार मानले. या वेळी  ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मोहन इंगळे ,उपाध्यक्ष श्याम सारस्वत, दिलीप लाड,डॉ.निर्मल अग्रवाल, ॲड. अश्विनी धन्नावत यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

 _________________
ग्राहक स्वतः न्याय मिळू शकतो : ॲड. महेश धन्नावत 
फसवणूक झालेल्या  प्रकरणांमध्ये गैरअर्जदारांकडून निष्णात वकील बाजू सांभाळतात या मुळे ग्राहकांना वकीलांचा आधार घ्यावा लागतो.तथापि ग्राहकांनी माहिती घेऊन आभ्यास केल्यास ते स्वतः न्याय मिळवू शकतात. असे सांगून मराठी व इंग्रजीत सोप्या व सुटसुटीत भाषांमध्ये सर्वसामान्यांना कळेल अशी माहिती उपलब्ध व्हावी या साठी ग्रंथ संपादीत केला. अशी भूमिका लेखक ॲड. महेश धन्नावत यांनी विषद केली.