नागमठाण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अर्चना खुरूद यांची बिनविरोध निवड

वैजापूर,१५ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील नागमठाण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी  अर्चना दत्तूकाका खुरुद यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून श्री.नरोडे यांनी काम पाहिले.

तलाठी गायकवाड व ग्रामसेवक पुरी यांनी त्यांना सहकार्य केले. नूतन सरपंच अर्चना खुरूद यांचा वैजापूर बाजार समितीच्या माजी सभापती मंदाताई नारायणराव कर्डक यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी माजी सरपंच रामनाथ तांबे, नामदेव बापू सावंत, रावसाहेब नाळे, नारायण विखे, विठ्ठल गवळी, दीपक चामे, वैभव सावंत बाळु गायके, बबन गायके, हरी डांगे, संजय बोधक, गणेश नरहरे, अहमद भाई, किरण सावंत, प्रकाश कर्डक, उपसरपंच संजय गिरी, निखिल तांबे, रावसाहेब ढेरंगे, संभाजी तागड, योगेश कानडे, बाबासाहेब येवले, नानासाहेब बर्डे, उत्तम दादा येवले, बाबासाहेब खुरुद, भरत बढे, सुधीर तांबे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी मंडळी शिवसेना युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.