भाग्यनगर येथे महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन व स्पर्धा

Displaying 1647348275883.jpg

जालना,१५ मार्च  /प्रतिनिधी :-आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून  भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सदस्या प्रा. मनीषा राजेंद्र भोसले यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर व विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
भाग्यनगर परिसरातील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात आहार तज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी, भाजपा सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षा  शुभांगी देशपांडे, निवृत्त गृहपाल विद्याताई देशमुख ,दीपा बिनीवाले, मीना डोईफोडे, संयोजिका प्रा. मनिषा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती . 
डॉ. अमृता कुलकर्णी यांनी  “फिट है तो हिट है ” या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांना उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, वयोमानानुसार घ्यावयाची काळजी, संतुलित आहार व जीवन शैली आदींबाबत  मार्गदर्शन केले. 

यावेळी महिलांसाठी पासिंग बॉल, चमचा लिंबू ,पंपिंग बलून ,एक मिनिट उखाणे ,चुटकी टाळी अशा स्पर्धा घेण्यात आल्या. यात किरण जावळे, स्वाती घायाळ, वर्षा चाटूफळे, अनघा देशमुख ,शिवनंदा डोईफोडे यांनी बक्षिसे पटकावली. स्पर्धांचे परीक्षण सुमन जोशी व सुमन कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी भारतरत्न लतादीदी मंगेशकर व स्व. सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली वाहण्यात आली.

सूत्रसंचालन सुलभा कुलकर्णी यांनी केले तर स्वाती डोईफोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सिंधू घायाळ ,वंदना ढगे, सविता धोत्रे श्रद्धा भोज, लीला देशमुख, लता खरात ,अर्चना जोशी, बेबीताई धोत्रे, श्रीमती बखले यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.