कोरोना काळात कार्य करणाऱ्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व परिचरिकांचा हृदय सत्कार

वैजापूर,१५ मार्च  /प्रतिनिधी :-सामाजिक बांधिलकी जपून समाजातील गोरगरीब दुबळ्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या व कोरोना काळात गावोगावी जाऊन गोर-गरिबांना धान्य वाटप करणाऱ्या व सामाजिकत्वाची जाण ठेवणाऱ्या येथील “निर्मला इन्स्टिट्यूट” वैजापूरतर्फे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कार्य करून शेकडो कोरोनाग्रस्ताना जीवनदान दिलेल्या तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व विविध रुग्णालयातील नर्सेस यांचा महिला दिनाचे औचित्य साधत सेवाधर्म प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सोमवारी संस्थेच्या गौरव करण्यात आला.

Displaying IMG-20220314-WA0109.jpg

नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्ष खरड, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, फादर संजय ब्राह्मणे, फादर मोहन, नॅन्सी रोद्रीग्ज, मार्गारेट रिब्रेटो, सिस्टर लिलीयेन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

वक्त्यांनी महिला सबलीकरण व आत्मनिर्भरतेवर वक्तव्य करून महिलांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक छाया बंगाळ व शीतल त्रिभुवन यांनी केले त्यांना इरफान सय्यद यांनी सहाय्य केले.विशेष गौरव  अश्विनी बरकासे, माया म्हस्के, शेख रुखसाना,श्रीमती तांबे, सेवनिवृत्त शिक्षिका मार्गारेट बोर्डे व श्रीमती त्रिभुवन यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.या प्रसंगी पत्रकार दीपक बरकासे, ज्ञानेश्वर सिरसाट यांच्यासह ग्रामीण भागातील महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या. मुलींनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.इरफान सय्यद, छाया बंगाळ,  नॅन्सी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.