वैजापूर येथे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 519 प्रकरणे निकाली ; 16 कोटी 66 लाखांची वसुली

वैजापूर,१३ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये आज एकूण 5784 ठेवण्यात आली होती त्यापैकी 519 प्रकरणात तडजोड होऊन ती निकाली काढण्यात आली.16 कोटी 66 लाख 87 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
जिल्हा अप्पर न्यायाधीश एम.मोहियोदीन एम.ए. यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून लोक अदालतचे उदघाटन झाले.न्या.डी.एम.आहेर, न्या.पी.पी.मुळे. न्या.श्रीमती आर.एन.मर्क, न्या.एस.आर.शिंदे, न्या.श्रीमती पी.टी. शेजवळ, न्या.एस.एस.निचळ, न्या.श्रीमती पी.आर.दांडेकर, न्या.वाय.जे.तांबोळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये कोर्टातील 2815 प्रकरणे व वादपूर्व 2967 प्रकरणे अशी एकूण 5784 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी कोर्टातील 260 व वादपूर्व 259 अशा एकूण 519 प्रकरणात तडजोड होऊन ती निकाली काढण्यात आली. कोर्टातील प्रकरणात 14 कोटी,88 लाख,42 हजार 578 रुपये व वादपूर्व प्रकरणात 1 कोटी 78 लाख 44 हजार 971 रुपये अशी एकूण 16 कोटी 66 लाख 87 हजार 729 रुपयांची वसुली करण्यात आली.
विधीज्ञ मजहर बेग,संदीप कटारे,शरद हारदे, प्रफुल्ल पोंदे, आकाश ठोले,प्रदीप चंदने, रविंद्र मिसाळ,रईस शेख, पांडुरंग पवार,राहुल धनाड, ज्योती शिंदे, कुणाल हरिदास,माया जाधव,अशोक सोनवणे यांनी पंच म्हणून काम पाहिले.वकील संघाचे अध्यक्ष किरणकुमार त्रिभुवन, उपाध्यक्ष व्ही.जी.वाघ, सचीव वैभव ढगे, कोषाध्यक्ष नितीन बोराडे, सरकारी अभियोक्ता नानासाहेब जगताप, इम्रान खान, अनिल रोठे, राफे हसन, डी.एन.जाधव, संजय बत्तीसे, रमेश सावंत, सचिन दहिभाते,कृष्णा गंडे, जे.डी.हरिदास, देवदत्त पवार आदींनी परिश्रम घेतले.