विकास कामांचे भूमिपूजन

Displaying IMG_2515.JPG

औरंगाबाद,१२ मार्च / प्रतिनिधी :- आज पदमपूरा अंतर्गत सुनील पुराणिक यांच्या घरापासून ते शीतल पॅलेस पर्येंत, वेदांतनगर अंतर्गत हॉटेल शिव राणा पासून ते जाधव यांच्या घरापर्यंत, कांचनवाडी -नक्षत्रवाडी अंतर्गत लक्ष्मीनगर येथील सिमेंट रस्ताचे तसेच विटखेडा अंतर्गत शंकरनगर येथे भूमिगत गटार या योजनेचे बांधकाम करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सिंध्दात शिरसाट, शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख संजय बारवाल, सतीश निकम, वसंत शर्मा, विभागाप्रमुख सुरेश गायके, प्रकाश कमलानी, कन्हैया देवतवाल, सतीश मोहोरे, विनोद देवतवाल, बाळू गडवे, बंटी सोनवणे, विजय पैठणे, सचिन वाहुळकर, पराग कुंडलवाल, सागर वाघचौरे, महेंद्र घोडेले, किरण गंगारे, राजू ऊंटवाल, मनमोहनसिंह बिंद्रा, महिला आघाडी प्रभावती बारवाल, अनिता मंत्री आदींची उपस्थिती होती.