औरंगाबाद जिल्ह्यात २५१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू

औरंगाबाद

जिल्ह्यात मंगळवारी (१४ जुलै) २५१ नवे करोनाबाधित आढळून आले. यामध्ये शहरातील ११७ व ग्रामीण भागातील १३४ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ९०६५ झाली आहे. शहरातील सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ३६४ झाली आहे.५३५५ बाधित हे आजवर करोनामुक्त झाले आहेत. पैकी १२६ बाधित हे मंगळवारी करोनामुक्त झाले, ज्यामध्ये शहरातील १०० व ग्रामीण भागातील २६ करोनामुक्त व्यक्तींचा समावेश आहे. तसेच ३३४६ बाधितांवर सध्या विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पदमपुरा येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्णाला एक जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी (१३ जुलै) सायंकाळी साडेसहाला मृत्यू झाला. आंबेडकर नगर येथील ४९ वर्षीय महिला रुग्णाला ९ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले होते. उपचार सुरु असताना रुग्णाचा सोमवारी रात्री साडेनऊला मृत्यू झाला. औरंगपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला २३ जून रोजी घाटीत दाखल केले होते व त्याच दिवशी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालावरुन रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच रुग्णाचा सोमवारी मध्यरात्री दीड वाजता मृत्यू झाला. राम नगर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला ६ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे दुसऱया दिवशी स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला. औरंगपुरा येथील ६८ वर्षीय महिला रुग्णाला ८ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच उपचारादरम्यान रुग्णाचा मंगळवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. तर, भाग्यनगर येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास सोमवारी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्णाचा रात्री साडेआठ वाजता मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत घाटीमध्ये २८० बाधितांचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या आता ३६४ झाली आहे.

महापालिका हद्दीत ११७

शहर परिसरातील बाधितांमध्ये घाटी परिसर येथील ३, शंभू नगर १, सादात नगर १, रमा नगर १, शिवनगर १, ईटखेडा ३, राजाबाजार १, जाधवमंडी २, जटवाडा रोड १, किराडपुरा १, दाना बाजार १, एन-दोन सिडको १, एन-दोन, हडको १, एन-चार सिडको ४, गांधी नगर १, कॅनॉट प्लेस १, ज्योती नगर १, माऊली तरंग १, भारत नगर २, जाफर गेट १, क्रांती नगर १, सेना नगर, बीड बायपास १, शाहिस्ता कॉलनी १, नवनाथ नगर १, विवेकानंद नगर २, सिल्कमिल कॉलनी १, नगारखाना, गुलमंडी १, घाटी परिसर १, नेहरू नगर ४, भवानी नगर ४, मयूर नगर १७, शिवाजी नगर २, नक्षत्रवाडी ६, एसबीआय सिडको ३, अमृत साई प्लाझा ६, शांती निकेतन ९, समता नगर ७, सादातनगर १, टीव्ही सेंटर १, एन-तीन २, एन-१३ येथे १, कांचनवाडी ५, इटखेडा ३ आदी भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात १३४

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये वाळूज येथील १, गणेश कॉलनी, सिल्लोड १, बजाज नगर १, मारवाडी गल्ली, लासूरगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ५, स्वस्त‍िक नगर, बजाज नगर १, हतनूर, कन्नड १०, माळी गल्ली, रांजणगाव १, दत्त नगर, रांजणगाव १, मातोश्री नगर, रांजणगाव १, आमे साई नगर, रांजणगाव ३, कृष्णा नगर, रांजणगाव २, स्वस्तिक नगर, साजापूर १, गणेश वसाहत, वाळूज १, देवगिरी कॉलनी, रांजणगाव २, बापू नगर, रांजणगाव ४, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, कमलापूर फाटा, रांजणगाव १, फर्दापूर, सोयगाव ६, जयसिंगनगर, गंगापूर १, बोलठाण, गंगापूर १, मारवाड गल्ली, वैजापूर १, कुंभार गल्ली, वैजापूर ३, रांजणगाव येथील ७, छत्रपती नगर, रांजणगाव १, श्रीगणेश वसाहत, वाळूज १, स्वामी केशवानंद नगर, रांजणगाव ३, दत्त नगर, रांजणगाव १, विटावा, गंगापूर ६, अजिंक्यतारा सोसायटी, जिकठाण १, साठे नगर, वाळूज १, जुने रांजणगाव १, रांजणगाव शेणुपजी २, विजय नगर, वाळूज २, संघर्ष नगर, घाणेगाव १, म्हस्की चौफुली, वैजापूर १, कुंभारगल्ली, वैजापूर ३, बजाज नगर २, अजिंठा, सिल्लोड १, पळशी १, साऊथ सिटी १, समर्थ नगर, कन्नड २, विराज सोसायटी, बजाज नगर १, मनोमय रेसिडन्सी, सिडको महानगर १, जयभवानी चौक, बजाज नगर १, जयभवानी नगर, बजाज नगर १, सिडको महानगर दोन १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर २, निलकमल सोसायटी, बजाज नगर १, तिसगाव ७, पारिजात नगर, बजाज नगर १, द्वारकानगरी, बजाज नगर ३, श्रमसाफल्य सोसायटी, बजाज नगर ५, मयूर नगर, बजाज नगर, वडगाव १, कुंभेफळ १, बाळापूर २, सावंगी २, सिडको महानगर ७, बजाज नगर ५, तिसगाव ३ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या ९३ बाधित व्यक्तींचा जिल्ह्यातील नव्या २५१ बाधितांमध्ये समावेश आहे. यामध्ये `सिटी एंट्री पॉइंट`वर आढळलेले ३८, तर मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास आढळलेले ५५ बाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *