वैजापूर येथील सेंट मोनिका इंटरनॅशनल शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा ; कर्तबगार महिलांचा सन्मान

Displaying IMG-20220309-WA0068.jpg

येथील सेंट मोनिका इंटरनॅशनल स्कुल वैजापूर या इंग्रजी शाळेत जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विविध उपक्रमांना वर्षभर दिलेल्या सहभागाबद्दल 14 कर्तबगार महिला पालकांना सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गायन शिक्षिका फरीन शेख यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक शाळेच्या अध्यापिका मीना जाधव यांनी केले.शिक्षण संस्थेच्या सचीव तथा नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी आपल्या सुत्रसंचालनातून महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन महिलांच्या सन्मानार्थ विचार मांडले. घरची  जबाबदारी सांभाळून विविध क्षेत्रात कार्यकुशलतेचा ठसा उमटवणाऱ्या कर्तबगार महिलांना यावेळी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Displaying IMG-20220309-WA0069.jpg
शिक्षण संस्थेच्या सचीव तथा नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी

सेंट मोनिका इंटरनॅशनल या शाळेच्या सीबीएसई विभागाच्या नवीन इमारतीच्या संकल्प चित्राचे अनावरण यावेळी शिल्पाताई परदेशी यांच्याहस्ते करण्यात आले. पुढील एक वर्षात सदर इमारत ही पूर्ण करून अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त अशी नवीन इमारत उभी करण्याचा मानस श्रीमती परदेशी यांनी व्यक्त केला.शहरातील महिला तसेच शाळेतील शिक्षिका व विद्यार्थिनींना त्यांच्यात दडलेल्या कलागुणांना सादर करण्यासाठी सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देण्यात आले होते. महिला व विद्यार्थिनींनी नृत्य, गीत गायनसह उत्कृष्ट कलादर्शन सादर केली. विशेष म्हणजे शाळेच्या शिक्षिकांनी हिरवा व महिला पालकांनी गुलाबी रंगाची साडी परिधान करून पर्यावरण समृद्धीचा संदेश यावेळी दिला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर साळुंके,अमोल धामणे,राहुल नवले,विजय डांगे,अजय क्षिरसागर,आकांक्षा सोमाणी,प्रांजल कोठारी, प्रतीक्षा दाढे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी पुढाकार घेतला होता.मुख्याध्यापिका स्वाती शरद खैरनार यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.