जालन्यात काँग्रेसचे एकही झाड उगवू देणार नाही -शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा दावा

जालना ,९ मार्च / प्रतिनिधी :-जालन्यात काँग्रेसचे एकही झाड उगु देणार नसल्याचा दावा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 27 मध्ये आज दि. 8 मार्च रोजी विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, पंडीत भुतेकर, युवासेना विस्तारक अभिमन्यू खोतकर, माजी शहर प्रमुख बाला परदेशी, मराठवाडा अल्पसंख्यांक अध्यक्ष आलमखान पठाण, शेख जावेद, शेख नजीर, जफर खान, अंकुश पाचफुले, ताहेर खान पठाण, विजय जाधव, अशोक पवार,  सगीर भाई, अस्लम भाई, बबन मगरे, ॲड. अशपाक पठाण, बाडेखान पठाण, दीपक वैद्य, शुभम खंदारे, अब्दुल मोही, शेख इर्शाद, फरीद लाला आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की, जनतेने मोठ्या विश्‍वासाने जालना नगर पालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती दिली मात्र टक्केवारी दिल्याशिवाय विकास कामे पुर्ण होत नसल्याचा अजेंडा हाती घेतल्यामुळे शहराचा सर्वांगीन विकास होऊ शकला नाही. स्वतः आमदार, पत्नी नगराध्यक्ष, मुलगा नगरेसवकाच्या तयारीत आजून दोन-तीन मुले असतील तर ते ही निवडणुकीत आणणार का? स्वतःच्या कार्यकर्त्यांचे काम देखील टक्केवारी घेतल्याशिवाय करत नसणाऱ्यांनी दुसऱ्याला नाव ठेवू नये असा टोला आ. गोरंट्याल यांचे नाव न घेता खोतकर यांनी लगावला आहे. पुढे बोलतांनी खोतकर म्हणाले की, दुसऱ्याला नाव ठेवणारेे स्वतः कशा पद्धतीने वागत आहे हे जनेतेला कळून चुकले आहे. जालना शहरातील विविध रस्ते खराब झाल्याने  जालन्यात कोरोनामुळे जेवढा धोका निर्माण होत नाही त्यापेक्षा धुळीमुळे नागरीकांच्या आरोग्याल मोठा धोका निर्माण होत असून घाणीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कराव आंबेकर यावेळी बोलतांना म्हणाले की, नगर पालिका निवडणुकीमध्ये निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी नगरपालिका ताब्यात असतांनाही शहरामध्ये  विकासाचे कामे केले नाही. मागील 15 वर्षापासुन नगरपालिका ताब्यात, स्वतः आमदार, स्वतःच जलसम्राट झाले. मात्र जोपर्यंत नगर पालिका त्यांच्या ताब्यात होती तोपर्यंत शहराील खड्डे देखील त्यांना बुजविता आले नाही. जनतेने उमेदवारांना विचारले पाहिजे की पंधरा वर्ष नगरपालिका तुमच्या ताब्यात होती काय विकास केला. शिवसेनेने जेवढे विकास कामे केले तेवढे विकास कामे तुम्ही करून दाखवली का? जायकवाडी जालना पाणीपुरवठा योजनेसाठी आम्ही लातूरला गेलो. लातूरहून योजना मंजूर करून आणली आणि जलसम्राट मात्र दुसरे झाले अशी टीका अंबेकर यांनी केली.

मद्यसम्राट नसून आम्ही विकास सम्राट ः विष्णू पाचफुले
विकास कशाला म्हणतात हे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर यांनी आपल्या कर्यकाळात करून दाखविला असून आजही हे दोघे नेते शहराच्या विकासासाठी कुठलिही कसर सोडताना दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही मद्यसम्राट नसू विकास सम्राट आहेत असे  म्हणून शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी स्थानिक आमदाराचे नाव न घेता टीका केली.
कॉग्रेसचे बागडबिल्ले सांगत आहे की, आम्ही हे केले, आम्ही ते केले. परंतू जनतेला माहित आहे कोणी काय केले. भास्कराव आंबेकर नगराध्यक्ष असतांना त्यांच्या काळात विकासाची अनेक कामे झाली. खरोखरचे जलसम्राट खोतकर आणि अंबेकर हे दोनच नेते आहे. बाकी जलसम्राट नसुन मद्यसम्राट आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेकडे नगराध्यक्षपद येणार असल्याचा विश्‍वास शिवसेना शहर प्रमुख विष्णु पाचफुले यांनी व्यक्त केला आहे.