लॉयन्स गोल्ड ग्रुपतर्फे शालेय साहित्य वाटप मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम

जालना ,९ मार्च / प्रतिनिधी :- लॉयन्स क्लब ऑफ जालना गोल्ड व रॅॅपीड ग्रुपतर्फे शहरातील गायत्री विद्या निकेतन विद्यालयात विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले.  यामध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पेन, रबर, पेन्सील आदी देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॅपीडचे अध्यक्ष सुशील पांडेय होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी रिजन चेअरमन रामकुंवर अग्रवाल होते.  

सर्व लॉयन्स सदस्यांचे संस्थेचे प्रशासनिक अधिकारी ओमप्रकाश धानवाला यांनी स्वागत केले. याप्रसंगी लॉयन्स क्लब गोल्डचे अध्यक्ष अशोक हुरगट यांनी क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती दिली व मराठी भाषेचे महत्व विषद केले.यावेळी मंचावर मुख्याध्यापक जालावार, उपाध्यक्ष संतोष मुथा, सचिव ललीत कामड, प्रसिध्दीप्रमुख अशोक मिश्रा यांची उपस्थिती होती. सहशिक्षिका मंजु जामगे यांनी शिववचरीत्र व मराठी भाषेवर आपले विचार व्यक्त केले.ज्योती पांगारकर यांनी आभार मानले़