अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष म्हणून भदंत अंगुलीमाल शाक्यपूत्र महास्थवीर यांची निवड

जालना ,८ मार्च / प्रतिनिधी :-अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशाशक (अध्यक्ष) म्हणून नागेवाडी  बौद्ध विचाराचे प्रमुख भदंत अंगुलीमाल शाक्यपूत्र महास्थवीर यांची  निवड करण्यात आली आहे.    

भदंत करुनानंद महाथेरा, भदंत प्रज्ञादीप महास्थविर, डॉ.भदन्त उपगुप्त महास्थविर, भदंत बुद्धसिरी, पू. भदंत डॉ. ज्ञानदीप महास्थवीर,  भदंत विरत्न महास्थविर, व  भिक्खू शिवली यांनी त्यांचे अभिनंदन केले. भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांची या पदावर निवड झाल्याबद्दल  १० मार्च रोजी नालंदा बौध्द विहार विपश्यना केंद्र नागेवाडी येथे सत्कार समारंभाचे  आयोजन करण्यात आले  उपासक, उपासिका यांनी  उपस्थित रहावे, असे आवाहन भन्ते शाक्यपूत्र शिवली यांनी केले आहे.