खंडाळा- बिलोणी रस्त्यावरील पूल बांधकामासाठी 28 लक्ष रुपये मंजूर ; आ.बोरणारे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

वैजापूर ,६ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील मौजे खंडाळा येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत मंजूर झालेल्या खंडाळा – बिलोणी रस्त्यावरील पूल बांधकामासाठी 28 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आ.रमेश  पाटील बोरनारे  यांच्याहस्ते रविवारी करण्यात आला.

 याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची यावेळी भाषणे झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.काकड, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गोरख पाटील आहेर, माजी सरपंच गोरखनाथ शिंदे, महेश पाटील बुनगे, नानासाहेब पाटील जगदाळे, उपविभागप्रमुख संतोष मामा दौंगे, पांडूरंग पाटील जगदाळे,  विनोद अंबिलके, सरपंच सुभाष पाटील कदम, चंद्रकांत पवार, बाळासाहेब पाटील चेळेकर, दिलीपकाका जाधव, बाबासाहेब राऊत, प्रकाश वाघ, संतोष निकम, किशोर जगदाळे, वाल्मिक शेजुळ, किरण निकम, नवनाथ पवार, संदीप पवार, विजयनाना मगर, विजय मगर, रहिम भाई बागवान, मुरलीनाना थोरात, नवनाथ शेजुळ, दादासाहेब ठोंबरे, विजय शिंदे, रमेश सोनवणे, किरण पवार, निलेश जगधने, मुकेश पवार, विजय सोनवणे, दिनेश सोनवणे, विनोद पवार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.