डॉ. हिंमतराव बावस्कर यांना मिळालेला ‘पद्मश्री ‘पुरस्कार हा जालना जिल्ह्यासाठी भूषणावह-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

जालना ,६ मार्च / प्रतिनिधी :-जालना जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. हिंमतराव बावस्कर यांना मिळालेला ‘पद्मश्री ‘पुरस्कार हा जालना जिल्ह्यासाठी भूषणावह आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे काढले.      

जालना मारवाडी संमेलन व पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर नागरी सत्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ( ता. ५)रुख्मिणी गार्डन येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ना. दानवे बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार बबनराव लोणीकर, माजी मंत्री अर्जूनराव खोतकर, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, महाराष्ट्र मारवाडी युवा मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश पंचारिया आदींची या सत्कार सोहळ्यास प्रमुख  अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर विचारमंचावर सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल, मारवाडी संमेलनाचे जालना जिल्हाध्यक्ष सुभाष देविदान, शहराध्यक्ष नितीन तोतला,नागरिक सत्कार समितीचे स्वागतमंत्री रमेश देहेडकर,ॲड. ब्रम्हानंद चव्हाण आदींची  उपस्थिती होती.            

यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, डॉ. हिंमतराव बावस्कर हे भोकरदन तालुक्यातील देहेड येथील रहिवासी, जालना जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी कोकणातील जहरी अशा विंचवाच्या दंशावर औषध शोधून अनेकांना जीवदान दिले आहे. त्यांनी केलेले संशोधन, त्यांची उलेखनीय अशी रुग्णसेवा लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना’ पद्मश्री’ हा किताब जाहीर केला आहे, डॉ. बावस्कर यांना’ पद्मश्री’ हा किताब जाहीर होणे ही बाब जालना जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. शिवाय त्यांच्या आरोग्य सेवेतील कार्याची पावतीही आहे. डॉ. बावस्कर यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच असल्याचे दानवे म्हणाले.          

प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, पूर्वीच्या सरकारच्या काळात सरकारी पुरस्कारासाठी शिफारशी केल्या जात होत्या, मोदी सरकारच्या काळात मात्र पुरस्कार हा कौशल्य, गुणवत्ता व कामगिरीवरून दिला जात आहे. बियाणे तयार करणाऱ्या एका ग्रामीण भागातील महिलेला’ पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी विंचवाच्या दंशावर औषध शोधून  अनेकांचे प्राण वाचवले आहेत, त्यांनी केलेली रूग्ण सेवा, त्यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय असल्याचे गौरवोद्गारही डॉ. कराड यांनी यावेळी काढले.           माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री अर्जूनराव खोतकर, डॉ. जयप्रकाश मुंदडा आदींनी आपल्या समयोचित भाषणातून डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ, भागवत कराड आदी मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला. डॉ. बावस्कर यांच्या गौरव पत्राचे वाचन सत्कार सोहळा समितीचे स्वागत मंत्री  रमेश देहेडकर यांनी केले.              

विविध पुरस्काराचे वितरण

पद्मविभूषण स्व. राधेश्याम खेमका  यांच्या उलेखनीय कार्याबद्दल त्यांचे नातू आशुतोष खेमका, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. उद्योजक अनिल गोयल, दिनेश भारूका,योगेश मानधानी, आशिष भाला यांना’ जालना भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योजक रमेश मगरे,पुरूषोत्तम तोष्णीवाल, संजय लुणावत,जगदीश नाथानी, सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे, शेषराव जायभाये, पत्रकार विजय सकलेचा,योगगुरू प्रल्हाद हरबक यांना ‘समाजरत्न’  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उद्योजक नरेंद्र पहाडे, वेदाचार्य नागेश पाथूरडकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मंजूदेवी करवा, इन्नरव्हिल क्लबच्या  अध्यक्षा सौ. सविता कैलास लोया,सामाजिक कार्यकर्त्या राजेश्वरी संजय अग्रवाल , गौसेवक अनुप राठी, उद्योजक अशोक पांगारकर, सामाजिक कार्यकर्ते गजानन जांगीड यांना’ समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योजक रमेशचंद्र अग्रवाल  यांना ‘ मारवाडी मंच गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.        

या सोहळ्याचे प्रास्तविक   मारवाडी संमेलनाचे महाराष्ट्र संघटनमंत्री विरेंद्रप्रकाश धोका यांनी केले. संचलन डॉ. प्रभाकर शेळके व मनीष तवरावाला यांनी केले. या सोहळ्यास मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष महावीर जांगीड, गोविंदप्रसाद मुंदडा, सुनील राठी, भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे, सगीर अहेमद,विजय जैन,बाबुराव सतकर, सौ. रसना देहेडकर,वसंतराव देहेडकर,दिनकर घेवंदे,श्रीकांत शेलगावकर,अर्जून गेही,  संजय इंगळे,रविंद्र बैरागी, संदीप गिंदोडिया यांच्यासह मारवाडी संमेलन, मारवाडी युवा मंचचे पदाधिकारी तसेच जालना शहरातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.