औरंगाबाद जिल्ह्यात होणार महिलांसाठी विशेष क्रीडा महोत्सव: डॉ. कराड
असोशिएशन फॉर वूमन इन स्पोर्ट्सच्या स्पर्धेत ९३० महिला, मुलींचा सहभाग
औरंगाबाद,६ मार्च / प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला जिल्हानिहाय क्रीडा स्पर्धा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर महिलांसाठी स्वतंत्र क्रीडा महोत्सव घेऊन महिलांना निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी सांगितले.
असोशिएशन फॉर वूमन इन स्पोर्ट (एडब्ल्यूआयएस) तर्फे ‘औरंगाबादची वेगवान धावपटू’ निवडण्यासाठी आयोजित ६० मीटर स्प्रिंट धावण्याचा स्पर्धेत तब्बल ९३० महिला आणि मुलींनी सहभाग घेतला.
महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी आयोजित या स्पर्धेत ९३० मुली व महिलांनी सहभाग नोंदवला आहे. महिला दिनापर्यंत चालणाऱ्या या स्पर्धा युनिव्हर्सल हायस्कुल च्या मैदानावर खेळावल्या जाणार आहे. असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट्स तर्फे आयोजित ‘औरंगाबाद ची वेगवान महिला’ या स्पर्धेला जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद मेन ने हातभार लावला आहे. युनिव्हर्सल हायस्कुलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल ९३० महिलांनी सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना डॉ.भागवत कराड यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हानिहाय क्रीडा स्पर्धा घेण्याचे आणि लोकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन आम्हाला केले आहे. याच धर्तीवर महिलांसाठी खास क्रीडा महोत्सव घेण्यात येणार आहे. एडब्ल्यूआयएसच्या अध्यक्ष नमिता दुग्गल यांनी सांगितले की, ‘अश्या प्रकारच्या लहान अंतराच्या धावण्याच्या स्पर्धा या युरोपीय देशांमध्ये आयोजित केल्या जातात. मात्र आपल्या देशात अशी स्पर्धा पहिल्यांदा होत आहे. महिलांना या अनुभवामुळे आणि व्यावसायिक स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल’.
महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे, जायंट्स चे अध्यक्ष दिनेश गंगवाल, मुख्याध्यापिका सीमा गुप्ता, असोशिएशन फॉर वूमन इन स्पोर्ट्सच्या अध्यक्षा नमिता दुग्गल, उपाध्यक्ष डॉ.अपर्णा कक्कड, सहसचिव प्राजक्ता बिर्ला, कोषाध्यक्ष डॉ.केजल भारसाखळे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आंतराष्ट्रीय अॅथलेटिक्स पंच डॉ.दयानंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखालीअनिल निळे, डॉ.मनीषा वाघमारे, डॉ.नीलिमा, डॉ.सचिन देशमुख, राज जाधव, शशिकांत सिंग, पूनम राठोड, सचिन इंगळे यांनी परिश्राम घेतले.