केन्द्रीय अर्थ संकल्पावर जालना शहरात शनिवारी परिसंवाद,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड संवाद साधणार

   

औरंगाबाद,३ मार्च / प्रतिनिधी :- केन्द्रीय अर्थ संकल्पावर जालना शहरात शनिवार ५ मार्च रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.      

कलश सीड्स येथील सभागृहात दुपारी २- ५ वाजेदरम्यान आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सुरेश झुनझुनवाला हे राहणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे, महिकोचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले,मनमोहन कलंत्री,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आदी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.