अमिताभ, अभिषेक बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबई, 
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक, त्याची पत्नी ऐश्वर्या व मुलगी आराध्या यांच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली असून, त्यांना विशेष उपचारांची आवश्यकता नाही.

11 जुलै रोजी अमिताभ आणि अभिषेक यांना, तर दुसर्‍या दिवशी ऐश्वर्या व आराध्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सुरुवातीलाच ज्या औषधांचे उपचार करण्यात आले, त्यांचाच सकारात्मक परिणाम दिसत असून, वेगळ्या उपचारांची गरज नाही, असे नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ऐश्वर्या आणि आराध्या घरातच क्वारन्टाईन असून, तिथेच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *