मानकापूर क्रीडा संकुल सर्वसुविधांनी अद्ययावत करणार –क्रीडामंत्री केदार

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे क्रीडामंत्री यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

मानकापूर क्रीडा संकुल सर्वसुविधांनी अद्ययावत करणार – क्रीडामंत्री सुनील केदार

नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी :- कोरोना महामारीमुळे मुलांना घरातच रहावे लागत होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने प्रथमच नागपरात या राज्यस्तरीय बॅटमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे खेडाळूंच्या उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी स्फूर्तीने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या संकुलाला सर्वसुविधांनी अद्ययावत करण्यासाठी  दोनशे पन्नास कोटी खचून राज्यातील बालेवाडी संकुलाप्रमाणे करण्यात येणार असल्याचे  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले

विभागीय उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या विद्यमाने नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र राज्य खुली बॅटमिंटन स्पर्धेचे मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण् कार्यक्रम श्री. केंदार यांच्याहस्ते पार पडला. बॅटमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा कुंदा विजयकर, अरुण लखानी, मंगेश काशिकर, उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 27 मार्चला एरो मॉडलींग शोचे आयोजन सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. क्रीडा विभागाने संकुलाच्या व्यवस्थेकडे जातीने लक्ष देवून खेळाडूंना सर्वसुविधा पुरवाव्यात, अशा आदेश त्यांनी यावेळी दिले.

क्रीडा विभागाचा पदभार सांभाळल्यापासून विभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपण केला असून क्रीडा विद्यापीठाची उभारणी केली. देशात अशा प्रकारचे एकमेव विद्यापीठ असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर क्रीडा कौन्सिलची स्थापना केली. खेळाबद्दल असलेल्या आवडीमुळेच हे शक्य झाले. क्रीडा विकासास सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली येथे झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात राज्याच्या एनसीसी चमुने प्रथम क्रमांक पटकावून राज्याचे नावलौकीक केले, अशाचप्रकारे स्पर्धेतही प्राविण्य मिळवून आकाशाला गवसणी घ्या,राज्याचे नावलौकीक करा, अशा शुभेच्छाही त्यांनी विजेत्यांना दिल्या. कोरोना महामारीनंतर सुध्दा खेळाडूंमध्ये उत्साह असून खेळ अप्रतिम आहे,त्याबद्दल त्यांचे कौतुक त्यांनी केले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत 30 जिल्ह्यातील 531 खेळाडूंनी सहभाग घेतला. यावेळी श्री. केदार यांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले.