एका दिवसात 2.30 लाख कोरोना संसर्गाचा नवा विक्रम

नवी दिल्ली,
मागील 24 तासांत जगभरात 2 लाख 30 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, कोरोनाबाधित देशांमध्ये अमेरिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला आहे. या देशात 24 तासात 66 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने दिली आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, कोविड रुग्णांची संख्या जगभरात 1.27 कोटींवर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 5 लाख 64 हजारांपेक्षा अधिक आहे. रविवारी पहाटेपर्यंत एकू ण 1 कोटी 26 लाख 81 हजार 472 प्रकरणांची नोंद झाली, तर मृतांची संख्या 5 लाख 64 हजार 420 वर पोहोचली.

भारतात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 5.5 लाख

कोविड-19 च्या संक्रमणाला आळा घालणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी हाती घेतलेल्या सक्रीय, पूर्वदक्षतापूर्ण आणि समन्वयीत प्रयत्नांमुळे कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हळूहळू वाढते आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आणि वेळेत निदान यामुळे, सौम्य लक्षणे असतांनाच कोविड बाधित रूग्ण ओळखणे शक्य झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी, सर्वेक्षण यामुळे. संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आहे. लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना गृह विलगीकरणात, ऑक्सिमीटरचा वापर करुन त्यांच्यावर लक्ष ठेवल्याने रुग्णालयांवरील भार बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. अशा वर्गीकृत धोरणांमुळे आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे गेल्या 24 तासांत कोविडचे 18,850 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,53,470 इतकी झाली आहे.

आज देशातील रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारुन 63.02% पर्यंत पोहोचला. 19 राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी दराच्या तुलनेत अधिक आहे. ही राज्ये खालीलप्रमाणे:-

 राज्ये/केंद्रशासित प्रदेशरुग्ण बरे होण्याचा दरराज्ये/केंद्रशासित प्रदेशरुग्ण बरे होण्याचा दर
लद्दाख85.45%त्रिपुरा69.18%
दिल्ली79.98%बिहार69.09%
उत्तराखंड78.77%पंजाब68.94%
छत्तीसगड77.68%ओडिशा66.69%
हिमाचल प्रदेश76.59%मिझोराम64.94%
हरियाणा75.25%आसाम64.87%
चंदिगढ74.60%तेलंगणा64.84%
राजस्थान74.22%तामिळनाडू64.66%
मध्य प्रदेश73.03%उत्तर प्रदेश63.97%
गुजरात69.73%  

सध्या देशभरात 3,01,609 सक्रीय रूग्णांवर कोविड रूग्णालये, केअर सेन्टर्स किंवा घरी उपचार सुरु आहेत. देशात सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,51,861 ने अधिक आहे. गंभीर रुग्णांच्या उपचारपद्धतीत सुधारणा केल्यामुळे रुग्णांचा मृत्यूदर देखील 2.64%पर्यंत कमी झाला आहे. राष्ट्रीय टेलीकम्युनिकेशन सेंटर्सच्या माध्यमातून दिल्ली एम्स समर्पित कोविड रूग्णांना सातत्याने मार्गदर्शन करत आहे.खालील 30 राज्यांमध्ये कोविड मृत्यूदर राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा कमी आहे. 

राज्ये/केंद्रशासित प्रदेशमृत्यूदरराज्ये/केंद्रशासित प्रदेशमृत्यूदर
मणिपूर0%झारखंड0.8%
नागालँड0%बिहार0.86%
दादरा नगरहवेली- दीव दमण0%हिमाचल प्रदेश0.91%
मिझोराम0%तेलंगणा1.03%
अंदमान-निकोबार बेटे0%आंध्र प्रदेश1.12%
सिक्कीम0%पुद्दुचेरी1.27%
लद्दाख0.09%उत्तराखंड1.33%
त्रिपुरा0.1%तामिळनाडू1.42%
आसाम0.22%हरियाणा1.42%
केरळ0.39%चंदिगढ1.43%
छत्तीसगड0.47%जम्मू-कश्मीर1.7%
ओडिशा0.49%कर्नाटक1.76%
अरुणाचल प्रदेश0.56%राजस्थान2.09%
गोवा0.57%पंजाब2.54%
मेघालय0.65%उत्तर प्रदेश2.56%

गेल्या 24 तासांत देशात 2,19,103 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 1,18,06,256 चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. आता हे प्रमाण 8555.25 इतके आहे .

देशातील चाचण्यांची क्षमता आणखी वाढवण्यात आली असून आता 1200 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. त्यापैकी 852  सरकारी तर 348 खाजगी प्रयोगशाळा आहेत.

यानुसार,  

•  रियल टाईम RT  PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा : 626 (सरकारी : 389 + खाजगी : 237)

•  TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 474 (सरकारी: 428 + खाजगी 46)

•  CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 100 (सरकारी: 35 + खाजगी: 65)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *