गहलोत यांना 84 आमदारांचाच पाठिंबा ,पायलट यांच्या समर्थक गटाचा दावा

नवी दिल्ली,13:
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना फक्त 84 आमदारांचाच  पाठिंबा असल्याचा दावा सचिन पायलट यांच्या गटाने केला आहे. समझोत्यासाठी सचिन पायलट यांनी पक्षश्रेष्ठींकडे कुठलीही अट ठेवलेली नाही आणि दिवसभरात पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी बोललेलेही नाहीत, असे नाराज उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांच्या गटाने स्पष्ट केले आहे.

 Rajasthan Chief Minister

सचिन पायलट हे अजूनही दिल्लीतच आहेत आणि अशोक गहलोत यांच्याशी जुळवून घेण्याच्या मूडमध्ये नाहीत, हेही आता स्पष्ट झाले आहेत. दरम्यान, आपण भाजपात जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याने सरकार पाडण्यामागे भाजपाचे षडयंत्र असल्याचा अशोक गहलोत यांचा आरोपही पोकळ सिद्ध झाला आहे.

सोमवारी दुपारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांना समर्थन देणार्‍या शंभरपेक्षा जास्त आमदारांची मीडियासमोर परेड केली होती. त्यावेळी अपक्ष धरून 104 आमदार उपस्थित होते आणि पाच आमदारांनी पत्र दिले आहे, असे गहलोत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते. सचिन पायलट यांच्यासह 17 आमदार हे पायलट गटात आहेत आणि त्यांचा गहलोत यांना विरोध आहे, अशीही बाब समोर आल्याने आज जरी कॉंग्रेसचे सरकार वाचले असले तरी उद्या धोका होणारच नाही, याची शाश्वती राहिलेली नाही.
 
सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी प्रियंका गांधी-वढेरा, राहुल गांधी, अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, पी. चिदम्बरम्‌ यांनी प्रयत्न केले आणि हे पाचही नेते पायलट यांच्याशी बोलले असे सांगितले जात असतानाच, प्रत्यक्षात सचिन पायलट यांनी मात्र माझ्याशी कुणीही बोलले नसल्याचे स्पष्ट केल्याने काँग्रेस  नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे. सचिन पायलट यांचा गट अजूनही आपल्या कठोर भूमिकेवर कायम आहे आणि पक्षश्रेष्ठींशी बोलायलाही तयार नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
 
बहुमत सिद्ध करा : भाजपा
उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे राजस्थानातील कॉंग्रेस सरकार संकटात आले आहे. पक्षातील फूट टाळणे, गळती वाढू नये म्हणून कॉंग्रेस आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवणे आणि सचिन पायलट यांना वाटाघाटीत अडकवून ठेवण्यासारख्या विविध आघाड्यांवर कॉंग्रेसला सध्या लढावे लागत आहे. त्यातच विधानसभेत बहुमत सिद्ध करा, असे आव्हान भाजपाने कॉंग्रेसला दिले आहे. मुख्यमंत्री गहलोत आणि पायलट गटाकडून समर्थक आमदारांच्या पािंठब्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. राजस्थान विधानसभेत बहुमत चाचणीला गहलोत सरकार सामोरे गेल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे.

गहलोत सरकारला 106 आमदारांचा पािंठबा असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तत्काळ बहुमत सिद्ध करावे, असे आव्हान दिले. त्यांनी समर्थक आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवले. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही, हे यावरून सिद्ध होत आहे आणि सरकारला काही दिवस वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचे मालवीय यांनी म्हटले.
 
विधिमंडळ पक्षाचा गहलोत यांना  पाठिंबा
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना  पाठिंबा देण्याचा ठराव आज सोमवारी झालेल्या काँग्रेस  विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पारित करण्यात आला. अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील रस्सीखेच आणखी तीव्र झाली आहे. काँग्रेसला कमकुवत करणार्‍या कोणताही कॉंग्रेस आमदार िंकवा पदाधिकार्‍यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची शिफारस देखील या बैठकीत करण्यात आली. या बैठकीसाठी 106 काँग्रेस  आणि या पक्षाला पाठिंबा देणारे आमदार उपस्थित होते, असा दावा पक्षातील सूत्रांनी केला. या बैठकीकडे सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पाठ फिरवली.
 
धनशक्तीचा वापर करीत आमदारांना आकर्षित करून कॉंग्रेस सरकारला अस्थिर करण्याचा आणि लोकशाहीचा खून करण्याचा कट भाजपाने रचला, असा आरोप या बैठकीत पारित करण्यात आलेल्या ठरावात करण्यात आला. हा राजस्थानातील आठ कोटी नागरिकांचा अपमान आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
 
 
काँग्रेस  सरकार जायलाच हवे : भाजपा
नागरिकांचा विश्वास गमावल्याने राजस्थानातील काँग्रेस  सरकारने जायलाच हवे, असे राजस्थान भाजपाने आज सोमवारी म्हटले. भाजपा पायलट गटाला बाहेरून पािंठबा देईल का, या प्रश्नाला उत्तर देताना, आमच्याकडे सर्वच पर्याय खुले आहेत. केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशाप्रमाणे परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे भाजपाचे राजस्थानातील प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी सांगितले.
 
 
गहलोत गटाला रिसॉर्टमध्ये हलवले
काँग्रेस  विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर गहलोत सरकारला पाठिंबा असलेल्या आमदारांना आज जयपूरजवळील रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले. गहलोत यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी नेमके किती आमदार उपस्थित होते, याची अधिकृत माहिती काँग्रेस  पक्षाने दिली नसली, तरी या बैठकीत 106 आमदार उपस्थित असल्याचा दावा एका काँग्रेस  नेत्याने केला.
 
पायलट यांच्यासाठी द्वार खुले
एकीकडे सचिन पायलट यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे त्यांच्यासाठी चर्चेचे द्वार खुले असल्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी सचिन पायलट यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

मुख्यमंत्र्यांना केवळ 84 आमदारांचा पािंठबा
गहलोत सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. गहलोत गटाला केवळ 84 आमदारांचा पािंठबा असून, 30 आमदारांचा आपल्याला पािंठबा असल्याचा दावा उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपाचे नेते ज्योतिरादित्य िंशदे यांची भेट घेतल्यानंतर आज केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *