विज्ञानाचा हेतू मानव कल्याण : डॉ हिम्मतराव बावस्कर

विज्ञान प्रसार महोत्सवाचा समारोप

औरंगाबाद,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- येथील विवेकानंद महाविद्यालयात 22 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान झालेल्या  ‘विज्ञान प्रसार  महोत्सवाचा’ आज सातवा व समारोपाचा दिवस होता.
यावेळी विज्ञान प्रसार महोत्सवाच्या मुख्य समारोपीय कार्यक्रमासाठी पद्मश्री डॉ हिम्मतराव बावस्कर, श्रीमती प्रमोदिनी बावस्कर,  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव दत्तात्रय कहर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे गिरीशकुमार भसीन, के. सुब्बाराव , विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे यांनी उपस्थितांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयात आठवडाभर चाललेल्या विज्ञान प्रसार महोत्सवातील विविध स्पर्धा, व्याख्याने व इतर उपक्रमांचा संक्षिप्त आढावा घेतला.

Displaying _DSC8290.JPG


उपस्थित विद्यार्थी व श्रोत्यांशी संवाद साधताना डॉ. बावस्कर म्हणाले की आज विज्ञान व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेले आहे. या विज्ञानाचा हेतू विश्वकल्याण असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना स्वतःचे अनुभव सांगताना ते म्हणाले की, शिक्षण, संशोधन व सेवा करीत असताना समर्पण व निस्वार्थ भावना असणे आवश्‍यक आहे.  विचार करत असताना नेहमी देश, समाज, संघटना, कुटुंब व सर्वात शेवटी स्वतः असा क्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी फक्त गुणांच्या मागे न राहता आपण समाजासाठी काय देऊ शकतो याचा सातत्याने विचार केला पाहिजे. 

Displaying _DSC8333.JPG


यानंतर संपूर्ण आठवडाभर घेण्यात आलेल्या विविध विज्ञानकेंद्री स्पर्धांतील शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटातील विजेत्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

विज्ञान सप्ताहाच्या आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे विविध उपक्रमांनी झाली. यावेळी सकाळच्या सत्रात कृषी उत्पन्न तसेच कृषी विकासावर आधारित हार्टीकल्चर व व्हॅल्यू  ऍडिशन या माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले.
 यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. वनारे, उपप्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे, डॉ. आर.बी. शेजुळ, श्रीमती एम. एम. मुरंबीकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. अशोक गायकवाड व डॉ. नितीन अधापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शर्मिष्ठा ठाकुर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी चालू असणा-या विज्ञान पुस्तक मेळा, माहिती तसेच चित्रपट प्रसारण, सायन्स ऑन व्हील, मायक्रोबीअल सफारी इत्यादी उपक्रमांना विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या.