फुलंब्री तालुक्यात पोलिओ डोस मोहीम यशस्वी

फुलंब्री,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-फुलंब्री तालुक्यात 1 लाख 69 हजार 181 सर्वेक्षित लोकसंख्या असुन शुन्य ते पाच वयोगटातील 15 हजार 937 लाभार्थीना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट होते पैकी रविवार ( 27 फेब्रुवारी) 15 हजार 143 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे.

Displaying IMG-20220227-WA0025.jpg
फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे अंगणवाडी केंद्रावर पोलीओ डोस पाजतांना सरपंच सरला तांदळे, माजी उपसरपंच बाळासाहेब तांदळे व कर्मचारी.

ही पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुक्यात एकुण 154 पोलिओ बुथ ठेवण्यात आले होते. त्यापैकी 105 बूथ वर तीन कर्मचारी तर 49 बूथ वर दोन कर्मचारी कार्यरत होते. असे एकूण 413 कर्मचारी बूथ वर कार्यरत होते. बूथ वर आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका कार्यरत होत्या. बूथ वर पर्यवेक्षण करण्यासाठी 31 पर्यवेक्षक, 05 तालुका पर्यवेक्षक, 15 समुदाय आरोग्य अधिकारी, 10 वैद्यकीय अधिकारी, 1 तालुका आरोग्य अधिकारी, 1 जिल्हा स्तरीय नोडल अधिकारी कार्यरत होते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये पोलिओ बूथ ठेवण्यात आले होते. फुलंब्री बसस्थानक, टी पॉईंट, पाल फाटा, फरशी फाटा, खामगाव फाटा, इत्यादी अशा 33 ठिकाणी पोलिओ डोसची सुविधा पुरविण्यात आली. तर  तालुक्यात 11 फिरत्या पथकांची नेमणुक करण्यात आली होती.

रविवारी दिवसभरात तालुक्यातील 15 हजार 143 बालकांना पोलीओ डोस पाजण्यात आला. 95% काम झाले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न तर जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रेखा भंडारे यांनी मार्गदर्शन केले. राहीलेल्या बालकांना तीन  दिवसांच्या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरोघर जाऊन पोलिओचा डोस पाजणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न भाले यांनी दिली.