लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

मराठी राजभाषा दिनानिमित्त लेख

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी

          ह्या कवितेच्या ओळी ऐकल्या की आपल्याला आपल्या मराठी भाषेचा गौरव वाटतो. “पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा” असे  म्हणत अनेक  असलेल्या  तरुणाच्या पाठीचा कणा ताठ करणारे मराठीतील ज्येष्ठ कवी , कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि मराठी मनाचा मानबिंदू असलेले “कुसुमाग्रज”  म्हणजे ” वि. वा. शिरवाडकर” होय. दि. 27 फेब्रुवारी मराठी साहित्याचे भूषण वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो.

       मराठी असण्याबद्दल अभिमान वाटतो. पण माहिती का मराठी भाषा कशी अस्तित्वात आली आणि आपण मराठी दिवस का साजरा करतो. आज त्याबद्दल माहिती जाणून घेऊ यात.

      खरंतर संवादाचे मुख्य साधन म्हणजे भाषा आणि तसेच जगाच्या नकाशावर अनेक देश आहेत आणि अर्थातच प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. एवढ्या दूर कशाला जायचं आपल्या भारतातच घ्याना प्रत्येक राज्याची संस्कृती आणि भाषा संस्कृती वेगळी आहे. एकमेकांशी संवाद साधू इच्छिणाऱ्या दोन व्यक्तीला किमान एक भाषा येणे गरजेचे आहे. तरच तो संवाद व्यवस्थित साधला जाऊ शकतो. मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोणी नोकरीसाठी, कोणी शिक्षणासाठी तर कोणी व्यवसायासाठी हे सर्व घरा बाहेर पडले ते मराठी घेऊनच, आजच्या युगात बहुभाषिक असण उत्तमच पण त्यासोबतच आपली मातृभाषा ही देखील जोपासली पाहिजे. भाषा हे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेला देशप्रदेश बदलला की भाषा बदलते. भाषा हे संवादाचप्रभावी साधन आहे.  मराठी भाषेला तिचा स्वतःचा इतिहास व परंपरा आहे. मराठी  भाषेने  आपल्या मातेकडून म्हणजे संस्कृत भाषेकडून विपुल वैभव घेतलेआहे.

   आज महाराष्ट्रात सर्वत्र कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक या त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती तसेच मराठी माणसाच्या मनावर या साहित्यकृती कित्येकपरिणाम घालून आहे व त्यांच्या साहित्य सेवेसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी राजभाषा दिन या दिवसाला मराठी भाषा दिवस,मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते. मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे. तसेच ती भारतातील लोकसंख्येत  बोलली  जाणारी  तिसरी  भाषा  आहे.

             मराठी भाषेचा उगम नवव्या शतका पासून झालेला आपल्याला दिसतो. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला. देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी. भरभराट झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की “माझी मराठीची बोलू कौतुके, परीअमृताहे पैजा जिंके.”  म्हणजेच आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल अशी ग्वाही दिली. वसंत एकनाथ महाराजांनी  मराठी भाषेतून भारुडे लिहिली व ग्रंथांची भर मराठी साहित्यात घातली. अशा अनेक संतांनी मराठी भाषेचा उपयोग आपल्या जीवनामध्ये केला आहे. अशा प्रकारे अतिप्राचीन व समृद्ध अशी  परंपरा मराठी भाषेला आहे. तसेच जननी जन्मभूमी यांच्या बरोबरच माणसाला प्रिय असते ती त्याची जन्मभाषा मातृभाषा म्हणजेच मायबोली नवनाथ महाराष्ट्रातील सर्वजण आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो, आपली मायबोली फार पुरातन आहे. मराठी भाषेची परंपरा फार उज्वल आहे. मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित आहे. तिची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठीत फार मोठे लेखक तसेच कवी होऊन गेले आणि आजही आहेत. उदा.  वि. स. खांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, अच्युत गोडबोले इत्यादी त्याच बरोबर मराठी भाषा ही शब्द संपत्ती, काव्य संपत्ती, साहित्य संपत्ती  यांनी  समृद्ध आहे. माझ्या मराठी भाषा एवढी साहित्य समृद्ध आहे. मला वाटतं एकआयुष्य काही या साहित्याचा रसास्वाद घेण्यासाठी पुरणार नाही. तरीही मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नाही. मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे, असे इतिहासीचार्य वि. का. राजवाडे यांनी म्हटले आहे. मराठी भाषेची होत असलेली दुर्दशा दिवसेदिवस वाढत आहे. मराठी भाषेची स्थिती बदलणे काळाची गरज आहे. हल्लीच्या पिढीला मराठी भाषा बोलण्याची लाज वाटते यापेक्षा वाईट काय असेल? बोलण्या बरोबरच आपली मातृभाषा बोलण्याचाही अभिमान बाळगला पाहिजे.आपण मराठी भाषेला विधभाषा अशा होण्याचा सन्मान प्राप्त करून दिला पाहिजे.

            आज आमच्या मराठीचे इतिहास मराठीत रूढ होण्याची गरज आहे. वेगवेगळे विपुलकोश मराठीत निर्माण करण्याची गरज आहे. भाषा व वाड्मयाचा पातळीवर कथा, काव्य, नाटक, सिनेमा, कादबरी, आत्मकथन गीत हे सार समृद्ध लेखन मराठी दृष्ट लागावी इतक श्रेष्ठ लिहिलं गेलं पाहिजे. मराठी भाषेने प्रत्येकाला जगण्याचा मार्ग आणि ओळख दिली आहे. मराठी भाषेचे वळण हे भाषा म्हणून, ज्ञान म्हणून विचार म्हणून जास्त महत्त्वाचं वाटते. मराठी ही केवळ महाराष्ट्राची राज्य भाषा नसून आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नही असला पाहिजे. मराठी भाषेच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. मराठी माणूस आणि त्याची साहित्य कृती आणि साहित्य रुची जोपर्यंत आहे तो पर्यंत मराठी भाषेला मरण नाही. मराठी माणूसच  मराठी  भाषेला  विसरत चालला आहे. ज्या  मराठी  भाषेतून  पालक शिकलेले आहेत, तेच पालक आता आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकायला पाठवतात मराठी माध्यमांमध्ये शिकायला पाठवायला त्यांना कमीपणा वाटतो, अन त्यांच्या या कार्यामुळे आता मराठी शाळा बंद होत चालत आहेत. मराठी भाषेचा वात्सल्य मराठी माणसालाच जाणवत नाही.  मराठी भाषा ही खूप गोल अर्थाने नागरिकांची भाषा आहे हे पटवून देण्याची वेळ आली आहे.

                   मराठी भाषेला पर्याप्त प्रतिष्ठा मिळवून देण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांना मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजेत. आपण दुसऱ्या भाषा शिकत असताना मराठी  भाषेचे  महत्त्व जाणले पाहिजेत, आपली मराठी भाषा सामर्थ्यवान आहे. मराठी  भाषेच्या संवर्धनासाठी आपण मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजेत, तेव्हा कुठे मराठी राजभाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल. त्यासाठी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शाळा-कॉलेजमध्ये निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत तसेच एक ठिकाणी मराठी नाटके, काव्य संमेलन, मराठी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. त्या सोबतच प्रत्येक मराठी भाषिक  व्यक्तीने  इंग्रजी  शिकतानाच तितकाच मराठी भाषेचा अभ्यास करावा. अगदीच अभ्यास करणं जमणार नसलं तरी ही निदान आपली भाषा शुद्ध आणि व्यवस्थित बोलता येईल याची तरी काळजी घ्यावी. आपल्या येणाऱ्या पिढीला मराठीचं योग्य प्रशिक्षण देऊन नेहमी मराठी मध्येच बोलण्यास प्रवृत्त केल्यास, आपण आपली  भाषा भविष्यात योग्य तऱ्हेने जपू शकतो.

किर्ती  राजेंद्र  वाणी

औरंगाबाद