माजी मंत्री तथा आमदार अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

औरंगाबाद,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- माजी उद्योग राज्यमंत्री तथा प्रदेश सरचिटणीस पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुलजी मोरेश्वर सावे यांचा वाढदिवस 26 फेब्रुवारी रोजी सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:00 वाजता आमदार अतुल सावे यांच्या शुभहस्ते संस्थान गणपती मंदिर येथे आरती व नागरिकांना भेटण्यासाठी पुंडलिक नगर संपर्क कार्यालय येथे सकाळी 9:00 ते 11:00 या वेळेत थांबणार आहेत.

11 ते 4 या वेळेत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत जसे की, कामगारांसाठी आयोजित केलेली मोफत ई-श्रम नोंदणी व कार्ड वाटप, मोफत आयुष्यमान नोंदणी व कार्ड वाटप, व मतदार संघातील प्रत्येक वार्डात मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप, मोफत आधार नोंदणी कॅम्प, घाटी रुग्णालय येथे स्ट्रेचर वाटप, गरजूंना मेडिकल वाटप, विदयार्थांना शालेय साहित्य वाटप, तसेच ईतर अनेक समाजउपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. व त्या नंतर 4:00 ते 6:00 बजरंग चौक संपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी थांबणार आहेत व सायंकाळी 6:30 ते 9:00 अंजली कॉम्प्लेक्स ऑफिस खडकेश्वर येथे नागरिकांच्या भेटीसाठी थांबणार आहेत.