रांजणगाव शिवारात महिलेने केली आत्महत्या

फुलंब्री,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार पोलीस ठाणे हद्दीतील रांजणगाव शिवारात एका 29 वर्षीय महिलेने किरकोळ वादावरुन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. याबाबत वडोदबाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ही घटना गुरुवार ( 24 फेब्रुवारी ) दुपारी 1: 00 वाजेच्या दरम्यान घडली.शिला रामदास कोंडके वय 29 वर्षे राहणार रांजणगाव तालुका फुलंब्री असे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करणार्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहीती अशी की, रांजणगीव येथील शिला रामदास कोंडके यांनी किरकोळ वादावरुन राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. तिचे प्रेत शवविच्छेदनासाठी फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पवार हे करीत आहे.