वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी येथून तरुणी बेपत्ता

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी येथून संचिता कैलाससिंग कहाटे ही अठरा वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री बेपत्ता झाली.

तिची आई रेखाबाई कहाटे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनूसार, त्या आई वडील व तीन मुलांसह बेंदवाडी शिवारात राहतात. बुधवारी रात्री सर्व जेवण करुन झोपले. मात्र रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या आई शांताबाई बेडवाल यांना संचिता जागेवर झोपलेली दिसली नाही. म्हणुन त्यांनी रेखा कहाटे यांना उठवुन विचारले. तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यात आली. पोलिस नाईक झाल्टे हे तपास करीत आहेत