किनगाव येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

फुलंब्री,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे बुधवार ( 23 फेब्रुवारी )  संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी बोलबिंद भजनी मंडळी किनगाव यांनी सुंदर भजनाचे सादरीकरण केेेेले.सरपंच मनिषा चव्हाण, किशोर चव्हाण, पंढरीनाथ सोनवणे, तेजराव पाटील व देवनाथ सोनवणे यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. 

Displaying IMG-20220223-WA0083.jpg

याप्रसंगी बाळासाहेब शिंदे, मुकेश चव्हाण, विलासराव चव्हाण, निवृती सोनवणे, संताराम सोनवणे, संतोष देवकर, किशोर सोनवणे, सुभाष चव्हाण, काकासाहेब चव्हाण, उमेश चव्हाण, सुरेश सोनवणे, बाबासाहेब साळवे, रझाक शेख, चंद्रशेखर चव्हाण, बबनराव थोरात, कृष्णा चव्हाण, तुकाराम साळवे, किशोर शिंदे आदींची उपस्थिती होतीी. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन बाळासाहेब शिंदे यांनी केले.