गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सुंदर गणपती मंदिरात ग्रंथ पारायण व महाप्रसाद

वैजापूर ,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  येथील सुंदर गणपती मंदिर गजाजन भक्त परिवार यांच्या वतीने बुधवारी असणाऱ्या शेगावचे संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त श्री.गजानन विजय ग्रंथपारायण, गजानन कथा, महाप्रसाद व देखावे असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार (ता 21)रोजी चांदवड येथील ह.भ.प.दत्तू महाराज राऊत यांनी या ठिकाणी येऊन परायनार्थीना  गजाजन महाराजांचे चमत्काराची अनुभती एकविली. माजी नगराध्यक्ष साबेरखान यांनी आरतीत सहभाग घेतला.मंडळाचे काशीनाथ आगाज, संतोष बोथरा, श्याम जगताप, अजय भुजबळ,अरुण आंबेकर,;सुरेश बडनेरे, पुणे बंधू, संजय श्रीवास्तव,-कुणाल जगताप, विलास रामैय्या, राजू पुणे, संजय पुणे, नंदलाल बोथरा, धोंडीरामसिंह राजपूत आदींचा या कार्यक्रमात सहभाग आहे.ग्रंथवाचन प्रभाकरकुलकर्णी करीत आहेत.भारती सोनदे, मंगल जगताप सहकार्य करीत आहेत.