‘बामुटा’ च्या अध्यक्षपदी प्रा. भारती गवळी तर सचिवपदी डॉ.ओमप्रकाश जाधव

औरंगाबाद,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील औरंगाबाद व उस्मानाबाद उपकेंद्रात कार्यरत शिक्षकांची बामुटा‘ अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (पीजी) शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. भारती गवळी यांची तर सचिव म्हणून डॉ. ओमप्रकाश जाधव यांची निवड झाली. यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली.

Displaying Omprakash Jadhav.jpeg
डॉ. ओमप्रकाश जाधव

बामुटा’ या संघटनेचा २०१९ नंतर प्रथमच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार गुरूवार दि. १७ फेब्रु. रोजी आवेदन पत्र दाखल करण्यात आले. त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. चंद्रशेखर हिवरेप्रा.सुनील नरवडे व प्रा. सचिन देशमुख यांनी आज सोमवार दि. २१ रोजी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर केला.

संघटनेच्या अध्यक्ष म्हणून संगणकशास्त्र  व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रा. डॉ. भारती गवळी यांची निवड झाली. तर सचिव म्हणून संख्याशास्त्र विभागातील डॉ. ओमप्रकाश जाधव यांची निवड झाली.

Displaying Kailas ambhure.jpeg
डॉ.कैलास अंभुरे

उर्वरित कार्यकारिणीमध्ये मराठी भाषा व वाङ्मय विभागातील डॉ.कैलास अंभुरे (उपाध्यक्ष)गणितशास्त्र विभागातील प्रा. अमोल खंडागळे (सह‍सचिव) व व्यवस्थापनशास्त्र विभागातील डॉ. सोनाली क्षीरसागर (कोषाध्यक्ष) यांची बिनविरोध निवड झाली.  

Displaying Amol Khandagale.jpeg
प्रा. अमोल खंडागळे

बामुटा’ संघटनेच्या इतिहासातील प्रा. गवळी या पहिल्या महिल्या अध्यक्ष आहेत. तर संघटनेच्या कार्यकारिणीमध्येही प्रथमच महिलांना ३३% पेक्षा अधिक म्हणजे ४०% प्रतिनिधीत्व मिळाले आहे. तसेच संघटनेत प्रथमच तरूण प्राध्यापकांना संधी मिळाली आहे. या बिनविरोध निवडीबद्दल पूर्वकार्यकारिणीसह प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला.

Displaying Sonali Kshirsagar.jpeg
डॉ. सोनाली क्षीरसागर

याप्रसंगी माजी अध्यक्ष प्रा. रत्नदीप देशमुख यांनी स्वकार्यकाळात केलेल्या‍ कामांचा अहवाल सादर केला. पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. सतीश पाटील यांनी नव‍कार्यकारिणीस शुभेच्छा देताना संघटनेने कोणते प्रश्न  सोडवणे गरजेचे आहेयाविषयी आपले मत व्यक्त केले.

तर विद्यमान अध्य‍क्ष प्रा.गवळी यांनी आगामी काळात करावयाच्या काही कामांची माहिती देत विद्यापीठ  विभागातील शैक्षणिक गुणवत्तेतसह विद्यापीठाची प्रतिमा उंचावणे व प्राध्यापकांचे प्रश्न सक्षमपणे मार्गी लावणार असल्यातचे म्हटले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. एन. डोळे यांनी केलेतर प्रा. स्मीता अवचार यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. गीता पाटीलडॉ. प्रवीण यन्नावारडॉ. भास्कर साठेडॉ. रमेश मंझाप्रा.कल्याण शेजुळेप्रा. कीर्तीवंत घडलेसिनेट सदस्य प्रा.राम चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.