महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारीला

 21 हजार 168 उमेदवारांना प्रवेश, 2 हजार 195 अधिकारी, कर्मचारी नियुक्त

औरंगाबाद,२१ फेब्रुवारी/प्रतिनिधी :- जिल्हा केंद्रावर 26 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 12 या कालावधीत 65 

उपकेंद्रांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महारष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2021 परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी  21 हजार 168 उमेदवारांना प्रवेश असून परीक्षेसाठी  दोन हजार 195 अधिकारी,  कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेशासाठी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र, स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक 

आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड वाहन चालविण्याचा परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मूळ ओळखपत्र, सॅनिटयझर, 

पारदर्शक पाणी बॉटल या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य, वस्तू परीक्षा कक्षामध्ये 

घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी नाही. उमेदवारासोबत डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्यूटूथ, कॅमेरा फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेराच ठेवावे लागेल. 

मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल. साहित्य 

सांभाळण्याची जबाबदारी आयोगाची नाही. प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीत उमेदवार 

यांच्या बैठक क्रमांकानुसार दिलेल्या A,B,C,D  वर्णाक्षरांच्या संचापैकी त्याला दिलेल्या 

वर्णाक्षरांचाच प्रश्न पुस्तिकेचा संच वापरत आहे, याची पर्यवेक्षक व समवेक्षकांनी सातत्याने खात्री करावी.

परीक्षेकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 विषाणूच्या अनुषंगाने 

अतिरिक्त संरक्षणात्मक कीट, परीक्षेस उपस्थित प्रत्येक उमेदवाराकरिता आवश्यक कोविडकीट व फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांनाच 

वैयक्तिक संरक्षणात्मक साहित्य सामुग्री (पीपीई कीट) आयोगामार्फत पुरविण्यात येईल. उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्रच, परीक्षेकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे आदेश प्रवासासाठी पास 

म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस घेतलेलेअसावेत. नसल्यास त्यांनी नजिकच्या शासकीय रुग्णालयात 

जाऊन आरटीपीसीआर चाचणी करावी, त्याबाबतचा अहवाल सोबत बाळगावा. परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी नेमून दिलेले काम करणे बंधनकारक आहे. गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावून संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याबाबत कळविण्यात आल्याचेही त्यांनी कळवले आहे.