वैजापूर शहर व तालुक्यात शिवजयंती विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरी

वैजापूर,१९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  वैजापूर शहर व तालुक्यात आज शिवजयंती विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरी करण्यात आली.येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकाळी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्यावतीने अभिवादनाचा कार्यक्रम झाला.

Displaying FB_IMG_1645242848701.jpg

शिवक्रांती सेनेतर्फे शिवव्याख्याते संदीप पाटील औताडे यांचे व्याख्यान झाले.महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती परिवारतर्फे पंचायत समिती सभागृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले.याप्रसंगीं आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, माजी उपनगराध्यक्ष शेख अकिलसेठ,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, शहराध्यक्ष मलिक काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, सतीश शिंदे, नगरसेवक प्रकाश चव्हाण, दशरथ बनकर,गणेश खैरे, शैलेश चव्हाण, डॉ. निलेश भाटिया, प्रशांत कंगले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशसेठ बोथरा,अशोक धसे, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, चंद्रकांत कटारे, प्रमोद कुलकर्णी, महेश बुणगे,शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष सुनील बोडखे, सोमनाथ मगर यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Displaying FB_IMG_1645242859821.jpg


समाज परिवर्तनासाठी शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज – शिवव्याख्याते संदीप पाटील औताडे

Displaying IMG_20220219_135440.jpg

जनतेच्या कल्याणासाठी जगणारा व मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राणपलीकडे लढणारा विश्वातील एकमेव राजा म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराज होत. जगातील अनेक देशांना गनिमी काव्याचे व युध्यकौशल्याचे पाठ मागे ठेऊन देणारा जाणता राजा म्हणजे शिव छत्रपती महाराजच असून समाज परिवर्तनासाठी त्यांचे विचार आचरणात आणण्याची नितांत गरज आहे.असे प्रतिपादन शिव व्याख्याते संदीप पाटील औताडे यांनी आज वैजापूर येथील शिवक्रांती सेना शाखेच्यावतीने आयोजित शिवजयंती उत्साह कार्यक्रमात बोलताना केले.

प्रास्ताविक व सुत्रसंचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. शिवक्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील बोडखे,कार्याध्यक्ष सोमनाथ मगर, दादा घायवट, प्रदीप घुसळे,भगवान मगर, वाल्मिकी इंगळे, जालिंदर पवार यांच्यासह शिवक्रांती सेनेच्या ग्रामीण भागातीलपदाधिकारी  शिवजयंती कार्यक्रम गत 14 वर्षांपासून घेत आहेत.मिरवणूक,हार तुरे, स्वागत यासर्वांना फाटा देऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम ते दरवर्षी घेतात.शेवटी सुनिल बोडखे यांनी आभार मानले,